टीम लोकक्रांती
कोळगाव प्रतिनिधी | दि.१६ फेब्रुवारी २०२३ : श्रीगोंदा तालुक्यातील महत्वाच्या असणाऱ्या चिखली ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी इंजि. कुलदीप कदम यांची निवड झाली. शब्द दिल्याप्रमाणे सरपंच निलम अजिंक्य झेंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. माजी सरपंच, सेवा संस्थेचे चेअरमन रामदास झेंडे सर व रामेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अजिंक्य झेंडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते कुलदीप कदम यांची सरपंच पदी निवड करण्यात आली.
यावेळी कुलदीप कदम यांच्यासह माजी सरपंच नीलम अजिंक्य झेंडे,उपसरपंच शोभा मधुकर झेंडे,सदस्य वैशाली रामदास झेंडे व अक्षय बाळकृष्ण बोखारे हे नऊ पैकी पाच सदस्य एकत्र राहिल्याने विजय मिळाला. विरोधी गटाला चार मते पडली.
विकासशेठ भालेराव, फक्कड झरेकर, संभाजीराजे कदम, माजीसरपंच मच्छिंद्र झेंडे साहेब,माजी सरपंच भरत झेंडे, सोसायटीचे संचालक रामदास पंढरीनाथ झेंडे,अजित झेंडे व सर्व कार्यकर्त्यांच्या सहकार्याने ही निवड उत्साहात पार पडली. माजी सरपंच नीलम अजिंक्य झेंडे यांनी आपल्या कालखंडात सबस्टेशन, पाणीपुरवठा योजना व शाळा वर्गखोल्या मंजूर करून घेऊन चांगले काम केले. पुढील काळात सर्व विकासकामे पार पाडण्याची जबाबदारी नवनिर्वाचित सरपंचावर आहे. सर्व सहकाऱ्यांनी कुलदीप कदम यांचे अभिनंदन केले.
लोकक्रांती वृत्तांकन