टीम लोकक्रांती
श्रीगोंदा प्रतिनिधी | दि.१६ फेब्रुवारी २०२३ : विविध मागण्यासाठी अहमदनगर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने तालुका बालविकास प्रकल्प अधिकारी विनोद लोंढे यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी युनियनच्या वतीने कॉमेड राजेंद्र बावके- सरचिटणीस , मदिना शेख- जिल्हाध्यक्ष.नंदाताई पाचपुते-जिल्हा उपाध्यक्ष, रजनीक्षिर सागर- जिल्हा कार्याध्यक्ष.संगीता इंगळे श्रीगोंदा तालुका अध्यक्ष, मनिषा माने उपाध्यक्ष, फर्जना शेख, कुसुम उगले, सुमन पाचपुते, छाया राऊत, मिरा हिंगणे, वैजयंती ढवळे, शकुंतला देशमुख, सविता शिंदे, साके बाई, आदीसह मोठ्या प्रमाणावर अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचारी उपस्थित होत्या.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचऱ्यांचा दर्जा मिळावा, सन्मानजनक वेतनवाढ, दरमहा पेन्शन, आदी प्रमूख मागण्यांची दखल घेऊन तातडीने सोडवणूक करावी. २६ जानेवारी रोजी राज्यशासनाने अंगणवाडी कृतीसमितीला मानधनवाढीचे आश्वासन दिले होते.ते पाळावे अन्यथा राज्यातील सर्व अंगणवाडी कर्मचारी दि. २० फेब्रुवारी पासून राज्यव्यापी अंगणवाडी बेमुदत बंद ठेवण्यात येईल असे निवेदन देण्यात आले.
लोकक्रांती वृत्तांकन