टीम लोकक्रांती
कोळगाव, श्रीगोंदा | दि.२० फेब्रुवारी २०२३ : सध्याच्या काळात गावाची प्रगती रस्त्याच्या कडेने होत असून पाठीमागे गाव ओस पडत चालले आहेत.शहरामध्ये मोठ मोठे प्रोजेक्ट धुळखात पडून असून तेथील फ्लॅट विकले जात नाहीत ही वस्तुस्थिती आहे. कोळगावची वाटचाल शहराच्या दिशेने होत आहे हे आशादायक चित्र आहे. असे प्रतिपादन तिरूमला कन्स्ट्रक्शन निर्मित, संकल्प कॉम्प्लेक्स चे भूमिपूजन प्रसंगी अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी केले.
संकल्प कॉम्प्लेक्स चे भूमिपूजन अहमदनगर जिल्हा बँकेचे माजी संचालक दत्तात्रय पानसरे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोळगाव मधील ज्येष्ठ नागरिक व माजी सभापती भास्करराव नलगे हे होते.यावेळी जिल्हा बँकेचे माजी संचालक दत्तात्रय पानसरे, बाळासाहेब नलगे, मधुकर लगड, मनोज इथापे ,धोंडीबा लगड, विष्णू जठार, पुरुषोत्तम लगड, यांनी आपली मनोगत व्यक्त केली.
तिरूमला कन्स्ट्रक्शन निर्मित संकल्प कॉम्प्लेक्स भूमिपूजन सोहळ्यासाठी कुकडी कारखान्याचे संचालक भाऊसाहेब इथापे, सुभाष लगड, मोहन आढाव, पंचायत समिती सभापती संभाजीराजे दिवेकर, बाळासाहेब नलगे, हेमंत नलगे, पुरुषोत्तम लगड, नितीन डुबल, विजय नलगे, विश्वास थोरात, अमित लगड ,नितीन नलगे, मधुकर लगड, प्रकाश शेलार, धनंजय शिंदे सचिन जठार, जब्बार शेख, मधुकर शेलार, सुभाष काळाने, सरपंच कुलदीप कदम, गोरख झेंडे, पिनू झेंडे, सरपंच रमेश खोमणे ,गुलाब आढाव ,डॉक्टर रमेश पंधरकर, निंबाळकर ,बाबासाहेब नलगे, प्राथमिक जिल्हा बँकेचे माजी चेअरमन अविनाश निंभोरे ,ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रय जाधव, उपाध्यक्ष भास्करराव लगड ,आजी-माजी संघटनेचे अध्यक्ष विश्वासराव लगड, प्रहार संघटनेचे अध्यक्ष मिठू शिरसाट तिरुमला कन्स्ट्रक्शन चे प्रशांत बांदल, शुभम कार्ले , प्रसाद शिंदे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन महेशकुमार शिंदे यांनी तर आभार प्रदर्शन संकल्प डेव्हलपर्स व कुकडी कारखान्याचे संचालक मच्छिंद्र नलगे यांनी केले.
लोकक्रांती वृत्तांकन