टीम लोकक्रांती
दि. २७ ऑगस्ट २०२२,श्रीगोंदा : अल्पवयीन मुलीला फूस लावून पळून नेल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथे घडली आहे. रात्री उशिरा घरापासुन मोटरसायकलवर मुलीला पळून नेले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील बेलवंडी परीसरातल्या शिंदेवाडी येथील अल्पवयीन मुलीला सूरज राजू साळवे (रा.चोभेवाडी, बेलवंडी) या युवकाने फूस लावून राहत्या घरापासून दुचाकीवर बसवून पळवून नेले.
ही घटना सोमवारी दिनांक २२ ऑगस्ट २०२२ रोजी रात्री घडली. याबाबत मुलीच्या वडिलांनी बेलवंडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी सूरज साळवे याच्याविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.
स्त्रोत:ऑनलाईन वृत्त