केंद्रीय निवडणूक आयोगाच्या नाव आणि पक्ष चिन्हाच्या चुकीच्या निर्णयाचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जाहीर निषेध

शिवसेना तालुकाप्रमुख बाळासाहेब दूतारे, शहर प्रमुख संतोष खेतमाळीस व इतर पदाधिकाऱ्यांनी अतिशय तीव्र शब्दात तहसील येथे भाषणाद्वारे निषेध व्यक्त केला!

टीम लोकक्रांती
श्रीगोंदा शहर | दि.२० फेब्रुवारी २०२३ : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव व धनुष्यबाण चिन्ह या संदर्भात अतिशय चुकीचा निर्णय दिलेला असून या निर्णयाचा जाहीर निषेध व्यक्त करण्यासाठी श्रीगोंदा तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पूर्ण ताकदीनिशी सोमवार दि.२० फेब्रुवारी रोजी श्रीगोंदा तहसील कार्यालया समोर एकवटला होता.

तालुक्यातील सर्व शिवसैनिक पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे तालुक्यातील शिवसैनिक निष्ठेने ठाकरे व मातोश्री यांच्या आदेशाने येणाऱ्या काळामध्ये काम करणार आहेत.

तालुकाप्रमुख बाळासाहेब दुतारे यांच्या नेतृत्वाखाली सर्व शिवसैनिकांनी व पदाधिकाऱ्यांनी तहसील कार्यालय श्रीगोंदा येथे जाऊन माननीय तहसीलदारांकडे निषेदाचे निवेदन देण्यात आले.

यावेळेस शिवसेना तालुकाप्रमुख बाळासाहेब दूतारे, शहर प्रमुख संतोष खेतमाळीस व इतर पदाधिकाऱ्यांनी अतिशय तीव्र शब्दात भाषण करून निषेध व्यक्त केला.

या निषेदाच्या कार्यक्रमासाठी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते:, निलेश साळुंके, नूतनताई पानसरे,शरद नागवडे, रावसाहेब डांगे, गणेश लाटे, सागर खेडकर, नितिन लोंखडे, संभाजी घोडके, बापू मस्के, जमीर भाई शेख, संतोष बोळगे, जनाबाई गायकवाड, नानासाहेब दुतारे, अनिल सुपेकर, ञहरिभाऊ काळे, शिवाजी समदडे, नितीन लोखंडे, ओमकार शिंदे, रोहिदास मस्के, महेश पोळ, अखिल शेख, दामोदर शिंदे, संतोष चिकलठाणे, सागर साळुंखे, तुकाराम सकट, संजय चिकलठाणे, सुनील घोडके, नितिन शिंदे, राजु तोरडे, सुनिल शिंदे, प्रविण खेतमाळीस, चिमणराव बाराहाते, संदीप साबळे, संदीप साठे, अविनाश दिवटे, सोमनाथ नागरे, दादासाहेब मुंडेकर, संदीप शिंदे, अनिकेत परदेशी, अनिकेत मांडे, कृष्णा भालेराव, लालासाहेब रसाळ इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
लोकक्रांती वृत्तांकन

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
overcast clouds
23.3 ° C
23.3 °
23.3 °
84 %
6.8kmh
100 %
Mon
23 °
Tue
26 °
Wed
26 °
Thu
29 °
Fri
30 °
error: Content is protected !!