टीम लोकक्रांती
तांदळी दुमाला, श्रीगोंदा | दि.२२ फेब्रुवारी २०२३
श्रीगोंदा तालुक्यातील तांदळी दुमाला येथे खासदार सुजय विखे पाटील व आमदार बबनराव पाचपुते यांच्या विशेष प्रयत्नातून जलसंधारण अंतर्गत ६७ लाख रुपये किंमतीचा साठवण बंधारा व २ कोटी रुपयांची जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली असून, बुधवार दि.२२ फेब्रुवारी रोजी जलसंधारण अंतर्गत पाणी साठवण बंधारा बांधणे कामाचा शुभारंभ लोकनियुक्त सरपंच संजय निगडे यांचे हस्ते करण्यात आला.
या कामांसाठी तांदळी चे लोकनियुक्त सरपंच संजय निगडे व उपसरपंच राजेंद्र भोस व सदस्य यांनी खासदार सुजय विखे पाटील व आमदार बबनराव पाचपुते यांचे कडे पाठ पुरावा करून कोट्यावधी रुपयांचा निधी तांदळी दुमाला गावासाठी मंजूर करून आणला.
या दोन्ही कामाचे भूमिपूजन आमदार बबनराव पाचपुते यांनी पूर्वीच केले आहे.जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेचे काम प्रगती पथावर आहे.या साठवण बंधारा मुळे बऱ्याच शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. तसेच तांदळी गावातील मोठ्या प्रमानात पाणी प्रश्न सुटणार आहे व जल जीवन योजने मुळे सर्वांना घराघरात पाणी मिळणार आहे .
या कामाच्या शुभारंभ प्रसंगी उपसरपंच राजेंद्र भोस, सदस्य तुषार धावडे, झुंबर खुरांगे, नरसिंग भोस, सोसायटी चे माजी चेअरमन आबासाहेब भोस, सचिव अण्णासाहेब भोस,लक्ष्मण भोस, माणिक भोस, मनसुख देशमुख,अमोल भोस, सिताराम भोस ,मालदेव कचरे ,सुभाष कचरे , काशिनाथ हराळ व अप्पासाहेब हराळ उपस्थित होते .
लोकक्रांती वृत्तांकन