आमदार सत्यजित तांबे यांचा श्रीगोंदा तालुक्यात आभार दौरा

टीम लोकक्रांती
बेलवंडी, श्रीगोंदा | दि.२३ फेब्रुवारी २०२३ :
शिक्षक पदवीधर संघाच्या निवडणुकीत भरघोस मतांनी निवडून दिल्याबद्दल श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात पदवीधर मतदारांचे आभार मानण्यासाठी आमदार सत्यजित तांबे हे आले असता त्यांचा सत्कार बेलवंडी गावचे लोकनियुक्त सरपंच ऋषिकेश शेलार व उपसरपंच बाळासाहेब ढवळे यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी बोलताना आमदार तांबे म्हणाले की, आम्ही कर्मवीर भाऊराव पाटलांच्या विचारावर चालणारी माणसं आहोत त्यामुळे रयत सेवकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांचे प्रश्न आधी सोडवणार आहे.जुनी पेन्शन रोजगार निर्मिती, पदवीधरांचे प्रश्न, बेरोजगारी, शिक्षकांचे वेतन यासंबंधी चे प्रश्न सोडविण्यावर भर देणार असल्याचे तांबे म्हणाले.

आण्णासाहेब शेलारांच्या पाठीशी मोठी लोकं..!
आमदार तांबे सरपंच ऋषिकेश शेलार यांना म्हणाले की, गावपातळीवर काही मदत लागली तरी सांग नक्कीच मदत करू . अण्णासाहेब शेलार यांना काही मदतीची गरज नाही कारण त्यांच्या मागे खूप मोठी लोक आहेत .असा टोला नामदार विखे यांचे नाव न घेता लगावला.

बेलवंडी गावचे सरपंच ऋषिकेश शेलार यांनी पदवीधरांचे प्रश्न आमदार तांबेच्या समोर उपस्थित केले. यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे,आयजीपी चे प्राचार्य भोईटे सर,माजी उपसरपंच उत्तमभाऊ डाके,सोपान हिरवे,सुनिल ढवळे,युवराज पवार,ज्ञानदेव वाफारे,दिनेशआबा इथापे,गंगाराम हिरवे,गोपीचंद इथापे,दिलीप रासकर,संपतराव पवार,मधुकर शेलार,अशोक शेलार,अशोक शेलार,राजेंद्र कारंडे,नामदेव साळवे यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य उत्तमराम बुधवांतयांनी केले. सूत्रसंचालन दीपक कुलांगे यांनी केले तर आभार संतोष काळाने यांनी मानले.
लोकक्रांती वृत्तांकन

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
overcast clouds
26.4 ° C
26.4 °
26.4 °
68 %
10.2kmh
100 %
Tue
26 °
Wed
26 °
Thu
28 °
Fri
30 °
Sat
29 °
error: Content is protected !!