अहमदनगर येथे सावता परिषदेचे पाचवे त्रैवार्षिक अधिवेशन

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती

टीम लोकक्रांती
शेवगाव, श्रीगोंदा | दि.२७ फेब्रुवारी २०२३ :
माळी समाजाच्या न्याय हक्कासाठी राज्यभरात
संघटनकार्य करणार्या सावता परिषदेचे पाचवे त्रैवार्षिक अधिवेशन शनिवार दि. ४ मार्च रोजी सकाळी ११ वाजता नंदनवन लॉन्स अहमदनगर येथे दोन सत्रांमध्ये होत आहे. या अधिवेशनासाठी राज्यातील माळी समाज बांधवांनी हजारो हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश सचिव विजय शंकरराव शेंडे यांनी केले आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, माळी समाजाच्या प्रश्नांवर मंथन करण्यासाठी अहमदनगर येथे होणार्या पाचव्या त्रैवार्षिक अधिवेशनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे यांच्या अध्यक्षतेखाली हे अधिवेशन होत आहे. अहमदनगरचे प्रथम महापौर भगवानराव फुलसौंदर, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, नामदेव देवा राऊत, भास्करराव आंबेकर, शंकरराव बोरकर, करणजी ससाणे, बाळासाहेब बोराटे, अनिल झोडगे, छगन मेहेत्रे, शरद झोडगे, कारभारी जावळे, माणिक विधाते, विजय कोथिंबिरे, महेश निमोणकर, विनायक घुमटकर, जगन पाटील काळे, संजय जाधव, रमेश बारस्कर, अजिनाथ हजारे, देवराम शिंदे, किसनराव रासकर, लक्ष्मण ढवळे, खंडूजी भुकन, राम पेरकर, कृष्णा यादव, बाळासाहेब नरके, संतोष कोल्हे, दत्तात्रय शेंडे, प्रवीण डोंगरे, तुषार जाधव, पप्पूजी भोंग, लक्ष्मण डोमकावळे, तुकाराम चेडे, अमृता रसाळ, कैलास गाडीलकर, नितीन गोरे आदी प्रमुख अतिथि आदींसह सामाजिक, शैक्षणिक, संस्कृतिक,कला, क्रीडा क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित असणार आहेत.

समाज कार्यासाठी समाज संघटन हे ब्रिद घेऊन संघटना राज्यविस्तारामध्ये कल्याणराव आखाडे यांच्या नेतृत्वाखाली उल्लेखनीय कार्य करत आहे. समाजकारणाच्या ठिकाणी शंभर टक्के समाजकारण आणि राजकारणाच्या वेळी शंभर टक्के राजकारण असे कार्य सातत्याने करणाऱ्या संघटनेच्या या कार्यात आपणही सामील व्हा, समाजाच्या प्रगतीसाठी आवश्यक असलेल्या विचारांना ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.
विजय शंकरराव शेंडे
महाराष्ट्र प्रदेश सचिव सावता परिषद

तरी या कार्यक्रमासाठी माळी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन प्रदेशाध्यक्ष मयूर वैद्य, प्रधान महासचिव गणेश दळवी, महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा मनीषा सोनमाळी, मुख्य संघटक संतोष राजगुरू, प्रदेश सचिव विजय शेंडे, शरद माने, प्रदेश प्रवक्ते डॉ राजीव काळ, प्रदेश संघटक बापूराव धोंडे, अहमदनगर जिल्हाध्यक्ष निखिल शेलार, सुदाम लोंढे, पश्चिम महाराष्ट्र विभाग उपाध्यक्ष राहुल जावळे सह सावता परिषद प्रदेश कार्यकारिणी तसेच सर्व विभाग, जिल्हा, तालुका, शहर कार्यकारिणी व गाव शाखा पदाधिकारी, तमाम कार्यकर्ते, सावता सैनिक यांच्या वतीने करण्यात
आले आहे.
लोकक्रांती वृत्तांकन

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
light rain
25.5 ° C
25.5 °
25.5 °
76 %
6.1kmh
100 %
Sat
24 °
Sun
22 °
Mon
23 °
Tue
27 °
Wed
28 °
error: Content is protected !!