श्रीगोंदा मध्ये १ ते ५ मार्च दरम्यान जिल्हास्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन

खासदार सुजय विखे यांच्या हस्ते  उद्घाटन

टीम लोकक्रांती
श्रीगोंदा शहर | २८ फेब्रुवारी २०२३ :
श्रीगोंदा येथे आमदार बबनराव पाचपुते व खासदार सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक १ मार्च ते ५ मार्च २०२३ दरम्यान पारगाव रोडवरील इंडियन पेट्रोल पंपाच्या शेजारील जागेमध्ये स्मार्ट कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

या प्रदर्शनाचे हे चौथे वर्ष असून यावर्षी एस्कॉर्ट पावरट्रेक ट्रॅक्टर या प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक आहेत प्रदर्शनामध्ये प्रामुख्याने हार्वेस्टिंग यंत्रे, कृषी अवजारे, रासायनिक खते, नवनवीन आधुनिक शेती पद्धतीचे तंत्रज्ञान, शेती विषयक मार्गदर्शके, कुक्कुटपालन, शेततळ्या विषयी माहिती, पॅकेजिंग, कृषी विभाग, पाणी व्यवस्थापन, सौर ऊर्जा, पशुखाद्य, औषधे, डेरी इक्विमेंट, पोल्ट्री सोल्युशन, कृषिअर्थसायक, कृषी साहित्य, फलोत्पादन, ठिबक सिंचन त्याचबरोबर गृहउपयोगी वस्तू, खाद्यपदार्थांचे स्टॉल, बचत गटांचे स्टॉल असे दीडशे पेक्षाही अधिक स्टॉल असणारा आहेत

या प्रदर्शनाचे उद्घाटन १ मार्च रोजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या हस्ते व आमदार बबनराव पाचपुते यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून २ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता खेळ पैठणीचा हा कार्यक्रम, ३ मार्चला सायंकाळी ४ वाजता शेतकऱ्यांसाठी ऊस पीक परिसंवाद व सकाळी ११ ते ५ शॉन प्रेमींसाठी  डॉग शो, ४ मार्च श्रीगोंदा सोलो डान्स स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम, ५ मार्च पशुपक्षी प्रदर्शन, सरपंच संवाद व शेतकरी सन्मान सोहळा अशा भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी श्रीगोंदयासह जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार असून या प्रदर्शनामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवून आधुनिक शेती पद्धतीची माहिती घ्यावी अशी माहिती वाबळेज इव्हेंट चे अजय वाबळे व प्रा. विजय शेलार यांनी दिली.

याप्रसंगी मुख्य प्रयोजक पावरट्रेक चे किरण वानखडे, पोपट आबा खेतमाळीस, यात्रा कमिटीचे अध्यक्ष गोपाळराव, मोटे, बाळासाहेब महाडिक, गटनेते बापूशेठ गोरे, गटनेते गणेश भोस, नगरसेवक अशोक खेंडके, शहाजी खेतमाळी, संग्राम घोडके, सुनील वाळके, रमेश लाढाने, अंबादास औटी, संतोष शिरसागर, अरुणराव खेतमाळीस, राजेंद्र उकांडे, उमेश बोरुडे, संतोष मेहत्रे, अजय वाबळे, विजय शेलार आदी उपस्थित होते.
लोकक्रांती वृत्तांकन

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
moderate rain
23.7 ° C
23.7 °
23.7 °
85 %
7.1kmh
100 %
Sat
23 °
Sun
25 °
Mon
27 °
Tue
25 °
Wed
25 °
error: Content is protected !!