टीम लोकक्रांती
श्रीगोंदा तालुका | दि.२ मार्च २०२३ :
श्रीगोंदा येथील इंटरनॅशनल कुस्ती संकुल मधील मल्ल विविध ठिकाणी पार पडलेल्या कुस्ती स्पर्धेत विजेते ठरले दि.२१फेब्रुवारी ते २४ फेब्रुवारी दरम्यान झालेल्या स्वर्गीय खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धेत फ्री स्टाईल स्पर्धेत व चंद्रपूर येथे झालेल्या महाकाली आमदार चषक स्पर्धेत या मल्लानी नैपून्य दाखवले तर राज्यस्तरीय चंद्रपूर येथे माता महाकाली चषक स्पर्धेत भाग्यश्री फंड हिने प्रथम क्रमांकची गदा मिळवली ओंकार फंड, सुजल गुड तिसरा तर आयेशा शेख, दर्शन मते चौथ्या क्रमांकाचे मानकरी ठरले. धुळे येथे झालेल्या स्पर्धेत, वेदिका पवार सातारा गोल्ड मेडल पै साक्षी इंगळे सिल्वर मेडल तसेच शिरूर पुणे जिल्हा येथे सिद्धी होळकर हिने मल्ल सम्राट केसरी हा किताब जिंकून गदेचा मान मिळवला.
श्रीगोंद्यात हनुमंत फंड यांनी कुस्तीची आवड म्हणून मुलगी भाग्यश्री ,धनश्री हिला कुस्ती क्षेत्रात धडे दिले तिने कुटुंब आणि श्रीगोंद्याचे नाव सर्वत्र पोहोचव ले त्यामुळे श्रीगोंद्यातील इंटरनॅशनल कुस्ती संकूलात प्रवेशसाठी दुरवरून मल्ल येत आहेत.
प्रशिक्षक मेजर हनुमंत फंड,हरियाणा येथील नविन पोनिया, समाधान सर आणि संजय डफळ, आदर्श उद्योजक बाळासाहेब राऊत, तहसीलदार विजय बोरुडे, सुभाष शेठ मुनोत, शिवसेनेचे हरिभाऊ काळे यांनी विजेत्या मल्लांचे अभिनंदन केले आहे
लोकक्रांती वृत्तांकन