टीम लोकक्रांती
अहमदनगर | दि.३ मार्च २०२३ :
अहमदनगर जिल्ह्यातील जिरायती भागातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत जिव्हाळ्याची असलेली साकळाई उपसा जलसिंचन योजनेच्या सर्वेक्षणासाठी महाराष्ट्र शासनाने मंजूरी दिली असून एवढेच नाही तर या करिता दोन कोटी रूपयांचा निधी देखील मंजूर केला असल्याचे खा.डाॅ.सुजय विखे पाटील यांनी सांगितले.
अहमदनगर जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात जिरायती शेती असून या भागातील शेतकऱ्यांचा अत्यंत जिव्हाळ्याची योजना म्हणून साकळाई उपसा जलसिंचन योजने कडे पाहिल्या जायचे, केंद्रीय मंत्री स्व.बाळासाहेब विखे पाटील यांचे स्वप्न होते की ही योजना कार्यान्वित व्हावी परंतु काही ना काही अडचणी येत होत्या, मात्र २०२९ च्या विधान सभा निवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही योजना कार्यान्वित करू असा शब्द दिला आणि आज तोच शब्द त्यांनी पाळला असल्याचे खा.डाॅ.सुजय विखे पाटील यांनी सांगून आपले पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नामुळे तसेच श्रीगोंदाचे आ. बबनराव पाचपुते व माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या पाठपुराव्यास यश आले आहे.
या उपसा जलसिंचन योजनेच्या सर्वेक्षणास राज्य सरकारने मान्यते बरोबरच दोन कोटी रूपयाचा निधी देखील मंजूर केला आहे. ही योजना कार्यान्वित झाल्यावर चार कोटी ९८ टिएमसी पाणी या जिरायती भागातील शेतकर्यांना मिळणार असल्याचे विखे पाटील यांनी सांगून अहमदनगर जिल्हा हा आपणांस सुजलाम- सुफलाम करायचा असल्याचे सांगितले.
लोकक्रांती वृत्तांकन