टीम लोकक्रांती
श्रीगोंदा | दि.६ मार्च २०२३ :
श्रीगोंदा तालुक्यातील शिरसगाव बोडखा शिवारात घडलेल्या खुनाच्या घटनेचा तपास श्रीगोंदा पोलीसांनी जलदगतीने करत उत्कृष्ट कामगिरी करून खुनाच्या गुन्हयातील आरोपी ४८ तासामध्ये अटक केले. गुन्हा अनैतिक संबंधाचे कारणातुन अमोल आप्पा कुरुमकर वय २८ वर्षे व अक्षय नानासाहेब वाघस्कर वय २३ वर्षे दोघे रा वडाळी ता श्रीगोंदा जिल्हा अहमनदगर यांनी केला असल्याचे तपासात निष्पन्न.
सविस्तर माहिती अशी की फिर्यादी नाव श्रीरंग दशरथ शिर्के रा शिरसगांव बोडखा ता श्रीगोंदा जिल्हा अहमगनगर यांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे दि. ४ मार्च २०२३ रोजी श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली त्यावरुन श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे आरोपी नाव रामा राजु बरकडे व बिट्या राजु बरकडे दोन्ही रा बाबुर्डी ता श्रीगोंदा यांच्या विरुध्द जमीनच्या वादातुन खुन केल्या बाबत फिर्याद दिली होती. त्या बाबत श्रीगोदा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि क्रंमाक २७१/२०२३ भादवि कलम ३०२.३४ प्रमाणे दि. ४ मार्च २०२३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
ह्या गुन्हयाच्या तपासा दरम्यान तांत्रीक तपासाच्या मदतीने व गुप्त बातमीदार यांच्या मार्फतीने मिळालेल्या माहिती अन्वये हा गुन्हा अनैतिक संबंधाचे कारणातुन अमोल आप्पा कुरुमकर वय २८ वर्षे व अक्षय नानासाहेब वाघस्कर वय २३ वर्षे दोघे रा वडाळी ता श्रीगोंदा जिल्हा अहमनदगर यांनी केला असल्याचे निष्पन्न झाल्याने आज दि. ६ मार्च २०२३ रोजी त्यांच्या कडे चौकशी केली असता त्यांनी अनैतिक संबंधातुन संगनमताने मयत नाव दशरथ साहेबराव शिर्के वय ६५ वर्षे रा शिरसगांव बोडखा ता श्रीगोंदा यांचा खुन केल्याची कबुली दिली.
ही कारवाई पोलीस अधिक्षक अहमदनगर राकेश ओला ,अपर पोलीस अधिक्षक अहमदनगर प्रशांत खैरे , व उप विभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शणा खालील पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले पोसई समीर अभंग, सफौ ढवळे, सफौ विट्टल बडे, पोना गणेश गाडे इंगवले, पोकॉ अमोल कोतकर, रविंद्र जाधव, प्रताप देवकाते, गणेश साने श्रीगोंदा पोलीस स्टेशन तसेच पोका प्रशांत राठोड मोबाईल सेल अहमदनगर यांनी केली आहे.
लोकक्रांती वृत्तांकन