टीम लोकक्रांती
श्रीगोंदा | दि.८ मार्च २०२३ :
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून लेक वाचवा अभियान अंतर्गत श्रीगोंदा तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात जन्मास येणाऱ्या प्रत्येक मुलीस श्री स्वयंभू युवा प्रतिष्ठाण,श्रीगोंदा च्या वतीने एक ड्रेस किट भेट देण्याचा संकल्प सुरू करण्यात आला.अरिहंत उद्योग समुह अध्यक्षा प्रतिभा गांधी, यांचे हस्ते बुधवार दि.०८ मार्च २०२३ रोजी ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन ड्रेस किट भेट देण्यात आले.
हि संकल्पना सौरभ राऊत व सागर नगरे यांनी श्रीगोंदा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकर व प्रसाद टकले सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु केली या संकल्पनेस वर्षपूर्तीनिमित्त पुनश्च एकदा ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन ड्रेस किट भेट देण्यात आले.
या प्रसंगी उपस्थित अरिहंत उद्योग समुह अध्यक्षा सौ. प्रतिभा गांधी , डॉ.संघर्ष राजुळे सर,सौ.पुजा दरेकर, सौ. निशा राऊत, सौ.ससाणे सिस्टर श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालय स्टाफ व श्री स्वयंभू युवा प्रतिष्ठाण श्रीगोंदा परिवार उपस्थित होते.
लोकक्रांती वृत्तांकन