टीम लोकक्रांती
टाकळी कडेवळीत, श्रीगोंदा | दि.८ मार्च २०२३ :
८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त सकाळी अकरा वाजता टाकळी कडेवळीत येथे बैरागी बाबा मंदिरात महिला प्रबोधन मेळावा संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रणोतीमाई राहुल जगताप ह्या होत्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व अध्यक्ष निवड आरोग्य सेविका मंगल शेळके यांनी केले तर अनुमोदन ग्रामीण विकास केंद्र संस्थेचे महिला सक्षमीकरणाचे टीम लीडर पल्लवी शेलार यांनी केले.तसेच मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दिपप्रज्वलन करून पुढील कार्यक्रम सुरू करण्यात आला.
यावेळी प्रणोतीमाई यांनी महिलांना वैयक्तिक आरोग्य तपासणी नियमित करून घ्यावी तसेच चूल व मूल या शिदोरीत न राहता आपले जीवन आनंदमय सुखमय कसे होईल याकडे लक्ष द्यावे.
तसेच नायब तहसीलदार प्रगती कट्टेमॅडम यांनी शासनाच्या तहसील कार्यालयाच्या विभागातील सर्व योजनांची माहिती दिली आणि मुलींसाठी शिक्षणासाठी चे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्ते मीराताई शिंदे यांनी महिलांचा ८ मार्च महिला जागतिक दिन का साजरा केला जातो याची महिलांना माहिती दिली व महिलांना चूल आणि मुल सोडून घराबाहेर पडल्यानंतर महिलांचे हक्क अधिकार समजतात ते मीराताई शिंदे यांनी सांगितले.
दरम्यान डॉ. त्रिषाला विधाते मॅडम यांनी महिलांना बीपी शुगर एच बी तपासणी करण्यासाठीचे मार्गदर्शन केले तसेच वैयक्तिक स्वच्छता आणि मासिक पाळी व स्त्रीभ्रूण हत्या या विषयावर महिलांसोबत मार्गदर्शन केले.
तसेच टाकळी कडे वळीत गावचे उपसरपंच डॉ. सुभाष देशमुख यांनी महिला दिनानिमित्त सर्व महिलांना ८ मार्च महिला जागतिक दिनाच्या व आरोग्य बाबतची माहिती दिली व महिला जागतिक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.मंगल शेळके आरोग्य सेविका प्रा आ केंद्र आढळगाव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व आरोग्य विषयी विविध योजनांची माहिती दिली.कुसळकर मॅडम यांनी एकात्मिक बालविकास प्रकल्प मधील सर्व योजनांची माहिती महिलांना दिली व आहाराविषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचा समारोप सरपंच रूपाली इथापे मॅडम यांनी केला. तर आभार प्रदर्शन ग्रामीण विकास केंद्र संस्थेचे सीआरसी रोहिणी राऊत यांनी केले.कार्यक्रमासाठी उपस्थित सुनीता चौबे, कविता जाधव, जया वाळुंज, सुवर्णा सोनवणे, वैशाली वाळुंज, राणी नवले, सुनिता शिर्के, मीना सुपेकर, मीरा सोनवणे, रेखा वाळुंज, छाया भुजबळ, शारदा चव्हाण, पल्लवी शेलार, लता सावंत, उज्वला मदने, रोहिणी राऊत, सुनीता बनकर, सारिका गोंडे, मीना मोहिते, कविता सिदनकर, मंगल धेंडे, गिरजा घोडेकर व संतोष भोसले यांची जागतिक महिला दिनासाठी उपस्थितीती होती व गावातील मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
लोकक्रांती वृत्तांकन