टीम लोकक्रांती
नितीन रोही, श्रीगोंदा | दि.९ मार्च २०२३ :
श्रीगोंदा शहरातील गणपती मळा येथे जगद्गुरू संत तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळा आणि अखंड हरीनाम सप्ताह सोहळा दि.२ मार्च पासून भक्तीमय वातावरणात प्रारंभ झाला होता. आज ९ मार्च रोजी सकाळी ११ ते १२ पर्यंत ह.भ.प स्वरसम्राट योगेश महाराज खेंडकें यांचे काल्याचे किर्तन झाले.
दैनंदिन कार्यक्रम पहाटे ४ ते ६ काकडा भजन, सकाळी ८ ते १२ ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी ५ ते ६ प्रवचन ,सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ, रात्री ९ ते ११ कीर्तन, रात्री ११ हरिजागर असा सोहळा दरवर्षी प्रमाणे पार पडला.यामध्ये कलश पूजन, वीणा, टाळ मृदंग, ज्ञानेश्वरी, व गाथा पुजन करण्यात आले.
संत तुकाराम महाराजांच्या कथेचे व्यासपीठ चालक पोपट महाराज दांडेकर होते. २ मार्च पासून या सप्ताहास प्रारंभ झाला होता तर ज्ञानाई मुलींची वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची संस्थापक अध्यक्ष दीपकजी सुद्रिक महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेतील टाळकरी म्हणून ४० विद्यार्थीनींनी काम पाहिले. या संस्थेमधीलच बालकीर्तकार विद्यार्थीनींनी दरोज संध्याकाळी कीर्तन सेवा दिली.दि.८ मार्च रोजी दिंडी प्रदक्षिणा झाली. आज ९ मार्च रोजी सकाळी ११:००ते १२:००पर्यंत ह.भ.प स्वरसम्राट योगेश महाराज खेडकें यांचे काल्याचे किर्तन झाले.माजी नगराध्यक्ष कै.संतोष खेतमाळीस यांच्या स्मणार्थ महाप्रसादाचा कार्यक्रम होऊन सप्ताहाची सांगता झाली.
या कार्यक्रमाचे आयोजन ५० वर्षांपासून गणपती मळा परिसरातील नागरिक करीत असतात. गणपती मंदिरा मध्ये संत तुकाराम महाराज, श्री संत शेख महंमद महाराजांनी वास्तव्य केलेले आहे. त्यामुळे येथे दरवर्षी तुकाराम बीज साजरी करण्यात येते.
यावेळी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपध्यक्ष घनश्याम शेलार, डॉ. प्रतिभा पाचपुते, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले,नायब तहसीलदार निलेश वाघमारे,नगरसेविका सुनीता खेतमाळीस, डॉ.अरुण ढवळे,दादासाहेब औटी, सोनू शेठ औटी,नगरसेवक शहाजी खेतमाळीस, अंबादास औटी,नानासाहेब कोथिंबीरे, आदिकशेठ वांगणे,जयदीप दांडेकर, कांतीलाल दांडेकर, विशाल दांडेकर, विलास गणिशे,विकास अवसरे यांच्या सह अनेक नागरिक होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार नितीन रोही यांनी केले तर आभार संजय खेतमाळीस यांनी मानले.
लोकक्रांती वृत्तांकन