टीम लोकक्रांती
श्रीगोंदा | दि.१० मार्च २०२३ :
शुक्रवार दि. १० रोजी सकाळी दहा वाजता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून शनी चौक श्रीगोंदा येथे मोठ्या उत्साहात तिथीप्रमाणे येणारी शिवजयंती साजरी करण्यात आली.डीजे समोर नाचून शिवजयंती साजरी करण्यापेक्षा शिवचरित्र व्याख्यान ऐकून वैचारिक शिवजयंती साजरी करण्यात आली.
शिवजयंतीचे प्रतिमापूजन श्रीगोंदा तालुका पोलीस निरीक्षक भोसले साहेब व शिवसेना तालुकाप्रमुख बाळासाहेब दुतारे यांच्या शुभहस्ते करण्यात आले यानंतर महाराष्ट्रातील प्रसिद्ध शिवव्याख्याते निलेशजी जगताप यांचे शिवव्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
डीजे समोर नाचून शिवजयंती साजरी करण्यापेक्षा शिव व्याख्यान ऐकून शिवजयंती साजरी करण्याकडे यावेळेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने कल दिला याबद्दल समाजातील लोकांकडून शिवसेनाप्रमुख तालुकाप्रमुख बाळासाहेब दुतारे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे सर्व स्तरातून मोठ्या प्रमाणामध्ये कौतुक केले जात आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने नवनियुक्त पोलीस निरीक्षक भोसले साहेब यांचा सत्कार करण्यात आला.
या भव्य शिवजयंतीच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शिवसैनिक व युवा सैनिक सर्व पदाधिकारी उपस्थित होते. तालुकाप्रमुख बाळासाहेब दुतारे, सुरेश देशमुख, संतोष खेतमाळीस, उपतालुकाप्रमुख निलेश साळुंके, रावसाहेब डांगे, अरविंद कापसे, नानासाहेब शिंदे, चंद्रकांत धोत्रे, रघुनाथ सूर्यवंशी, सागर खेडकर, कृष्णा भालेराव, नितीन शिंदे, हरिभाऊ काळे, शिवाजी समदडे, गणेश लाटे, राजू तोरडे, सुनील शिंदे, देविदास तोरडे, प्रथमेश दरोडे, योगेश भुतकर, सुदाम सावंत, प्रवीण खेतमाळीस, चिमणराव बारहाते, राहुल नवले, संभाजी पाचपुते, संभाजी घोडके, दादा मुंडेकर, अनिकेत मांडे, अनिकेत परदेशी, नितीन लोखंडे, ओमकार शिंदे, बाळासाहेब शिंदे, भाना भाऊ वाबळे, भाऊ मस्के, संतोष चिकलठाणे, सोमनाथ धोत्रे, अजय साळुंखे, जनाबाई गायकवाड, अनिल सुपेकर, शिवाजी राऊत, अविनाश दिवटे, सोमनाथ नागरे, शरद नागवडे, संदीप उमाप, समीर शिंदे, सतीश मखरे, रंगनाथ डाळिंबकर, सुदाम मखरे, दिलीप पोटे, किरण दुतारे, वैभव क्षीरसागर आणि मोठ्या प्रमाणात शिवसैनिक युवा सैनिक नागरिक उपस्थित होते.
लोकक्रांती वृत्तांकन