टीम लोकक्रांती
श्रीगोंदा | दि.१२ मार्च २०२३ :
महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन (डी एन इ १३६) तालुका शाखा श्रीगोंदा कार्यकारणी निवडणूक राज्याचे नेते एकनाथराव ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार दि. ११ मार्च २०२३ रोजी श्री छत्रपती संभाजी महाराज सभागृह पंचायत समिती श्रीगोंदा येथे बिनविरोध पार पडली.
ही कार्यकारिणी निवड प्रक्रिया राज्याध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष एकनाथजी ढाकणे साहेब महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन (Dne-136), निवडणूक निरीक्षक तथा मानद अध्यक्ष कर्जत कांतीलाल माळशिकारे, निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा कोषाध्यक्ष सुभाषराव गर्जे ,सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा कार्याध्यक्ष कर्जत शुभम घोडके यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
- श्रीगोंदा तालुका कार्यकारणी पुढील प्रमाणे जाहिर झाली
अध्यक्ष तान्हाजी सोनबा पानसरे, मानद अध्यक्ष भीमराव विठ्ठल बेरड, कार्याध्यक्ष प्रतिभा अंबादास ढगे, सचिव गजानन नंदू होले, उपाध्यक्ष भाऊसाहेब दशरथ गलांडे, महिला उपाध्यक्ष स्वाती शिवाजी लामकाने, कोषाध्यक्ष शुभांगी दत्तू शिंदे, सहसचिव प्रतिभा दगडू डोमे, संघटक वैशाली एकनाथ साळवे, महिला संघटक उषा बाळासाहेब मेहेत्रे, सल्लागार सुदेश पुरुषोत्तम कराळे, प्रसिद्धीप्रमुख भाऊसाहेब जालिंदर जगताप, मार्गदर्शक अजित रमेश राऊत यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी या कार्यक्रमास व्हा. चेअरमन नारायण घेरडे, आदर्श ग्रामसेवक दत्ताजी वाघ, माजी अध्यक्ष संदीप लगड, जेष्ठ ग्रामसेवक नवनाथ गोळे, आदर्श ग्रामसेवक संदिप घायाळ, ग्रामसेविका वैशाली शिंदे, ग्रामसेवक औटी, मांडे फर्निचर चे मालक अरविंद मांडे हे उपस्थित होते.
लोकक्रांती वृत्तांकन