वीज टिकत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन!

पूर्ण दाबाने अखंडित वीज देण्याची घुगलवडगावच्या शेतकऱ्यांची आंदोलनाद्वारे मागणी

टीम लोकक्रांती
श्रीगोंदा | दि.१४ मार्च २०२३ :
श्रीगोंदा तालुक्यातील घुगलवडगाव या ठिकाणी विजेचा मोठ्या प्रमाणात खेळखंडोबा झाला असून शेतकरी पुरता हैराण झाला आहे त्यामुळे घुगलवडगावला पुर्ण दाबाने विज पुरवठा व्हावा या मागणीसाठी सोमवार दि.१३ मार्च रोजी श्रीगोंदा- नगर रस्त्यावरील घुगलवडगाव येथे सर्व शेतकरी, सरपंच तसेच उपसरपंच व ग्रामस्थांच्या वतीने आज भव्य रास्ता रोको अंदोलन करण्यात आले.

श्रीगोंदा तालुक्यातील घुगलवडगाव या ठिकाणी वीज टिकत नसल्यामुळे शेतकरी पुरता हैराण झाला आहे शेतातील पिके जळायला लागल्या आहेत पाणी उपलब्ध असतानाही विजेमुळे शेतीला पाणी देता येत नाही त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे हि परस्थिती मागील ३ वर्षांपासून असून यावर प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचे उत्तर दिले जात नाही.

घुगलवडगाव येथे गेली ६ महिन्यापासुन दिवसा आड थ्री फेज लाईट असुन तसेच सिंगल फेज ची लाईट ही देखील नसते गेली ६ महिन्यापासुन या गावाला विज पुरवठा हा पुर्ण दाबाने होत नाही. उलट वसुलीच्या नावाखाली पुर्ण घुगवडगावची लाईट कोणालाही कल्पना न देता नोटीस न देता व ग्रामपंचायतीला न कळविता उप कार्यकारी अभियंता डोळे हे शेतकऱ्यांना व विज ग्राहकांना वेठीस धरत असुन डोळे यांच्या कार्यकाळातील सर्व कामकाजाची चौकशी मंत्रालय स्तरावरील ऊर्जा विभागाच्या व महावितरणाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांमार्फत व्हावी.

तसेच शेतकरी महावितरण च्या कर्मचाऱ्यांना म्हणत आहेत पैशे घ्या पण आम्हाला २४ तास वीज द्या अश्या अनेक मागण्यासाठी गावातील नागरिकांनी रस्ता रोको केल्यावर प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यावर रास्ता रोको स्थगित करण्यात आला.

या आंदोलनात उप कार्यकारी अभियंता डोळे याना निलंबित करण्याची मागणी करण्यात आली महावितरण च्या अधिकाऱ्यांनी लेखी आश्वसन दिल्यावर रास्ता रोको मागे घेण्यात आला या रास्ता रोको आंदोलनात माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल ठवाळ, सरपंच मिलिंद कदम, रवींद्र गलांडे,गोपीचंद दांगडे,कैलास दांगडे,सुनील पवार,गौतम दांगडे,रोहिदास दांगडे,पोपट गलांडे, साहेबराव लोखंडे, कैलास चव्हाण, बापू पाचपुते, बाळासाहेब पवार,दादा ननवरे,बाळासाहेब पाचपुते,आबा चव्हाण, महेश पवार,सुधीर पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
लोकक्रांती वृत्तांकन

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
clear sky
38.5 ° C
38.5 °
38.5 °
13 %
3.9kmh
0 %
Fri
39 °
Sat
40 °
Sun
39 °
Mon
40 °
Tue
41 °
error: Content is protected !!