महाराष्ट्रात पुढील पाच दिवस वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा; १८ मार्चपर्यंत अलर्ट जारी

भारतीय हवामान विभागाकडून महाराष्ट्रात १८ मार्च पर्यंत अवकाळी पावसाचा इशारा जारी करण्यात आला असून त्यामुळे शेतीचे नुकसान होण्याचा अंदाज आहे.

टीम लोकक्रांती | दि.१४ मार्च २०२३ :
महाराष्ट्रात पुढील पाच दिवस वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाकडून आजपासून म्हणजे १४ मार्चपासून ते १८ मार्चपर्यंत अलर्ट जारी करण्यात आला आहे. या काळात विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मागील पंधरवड्यात दुसऱ्यांदा अवकाळीचा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कापणीला आलेल्या पिकांचं नुकसान होण्याचा अंदाज आहे.

अवकाळी पावसा संदर्भात हवामान खात्याचा अंदाज काय?

आज नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर जिल्ह्यात काही ठिकाणी गारपिटीसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

१५ मार्च रोजी धुळे, जळगाव, नाशिक, औरंगाबाद आणि जालन्यात काही ठिकाणी गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

१६ मार्च रोजी विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

१६ मार्च रोजी महाराष्ट्रात कोकणासह सर्वत्रच पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

१६ मार्च रोजी जळगाव, अहमदनगर, पुणे, औरंगाबाद जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी, वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे.

१६ मार्च रोजी अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम आणि यवतमाळमध्ये काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता आहे.

मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यात देखील हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
light rain
22.7 ° C
22.7 °
22.7 °
94 %
2.9kmh
100 %
Sat
22 °
Sun
22 °
Mon
23 °
Tue
27 °
Wed
28 °
error: Content is protected !!