टीम लोकक्रांती
अरणगाव दुमाला, श्रीगोंदा | दि.१५ मार्च २०२३ :
श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलीस ठाण्याअंतर्गत अरणगाव दुमाला येथील दिवटे वस्ती वरील कल्याण मच्छिंद्र गायकवाड(वय ४२) यांच्या घरी दि. १३ मार्च रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात ५ ते ६ दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकला. त्यामध्ये सुमारे पाच हजार रुपये रोख रकमेसह एक तोळे सोन्याचा ऐवज लंपास केला.तर अज्ञात दरोडेखोरांकडून कल्याण मच्छिंद्र गायकवाड यांना टणक हत्याराने डोक्यात झालेल्या जबर मारहाणीत यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, दि. १३ मार्च रोजी मध्यरात्रीच्या सुमारास श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलीस ठाण्याअंतर्गत अरणगाव दुमाला येथील दिवटे वस्ती येथे कल्याण मच्छिंद्र गायकवाड यांच्या राहत्या घरी मध्यरात्रीच्या सुमारास ५ ते ६ दरोडेखोरांनी घरामध्ये प्रवेश केला. त्यामध्ये त्यांनी कल्याण मच्छिंद्र गायकवाड यांच्या पत्नीच्या गळ्यातील व मुलीच्या कानातील सोन्याचा ऐवज दमदाटी व मारहाण करून हिसकवला तर घरातील रोख रक्कम ५ हजार रुपये घेतले.यामध्ये कल्याण गायकवाड यांनी दरोडेखोर यांना प्रतिकार केला असता त्यांनी त्यांच्यावर प्रती हल्ला करत त्यांना टणक हत्याराने जबर मारहाण केली.यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर जखम झाल्याने रक्तस्त्राव होऊन जागीच मृत्यू झाला.
बेलवंडी पोलीस ठाण्यासमोर अरणगाव येथील नागरिकांनी जो पर्यंत या खुनाच्या गुन्ह्यातील दरोड्याचा तपास लागत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेत अरणगाव येथील ग्रामस्थ व परिसरातील नागरीकांनी घेतल्याने मोठा पेचप्रसंग निर्माण झाला आहे त्यातच बेलवंडी पोलीस स्टेशनला एकाच महिन्यात तीन पोलीस निरीक्षक आल्याने पोलीस कर्मचारी व अधिकारी यांच्यात ताळमेळ नसल्याने बेलवंडी पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हे करण्याचे गुन्हेगारांचे मनोबल वाढले.
याबाबत ची माहिती बेलवंडी पोलीस स्टेशनला दिल्यानंतर बेलवंडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्यासह मोठ्या प्रमाणात फौज फाटा घटनास्थळी दाखल झाला.तद्नंतर पंचनामा केला व मयत कल्याण गायकवाड यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी श्रीगोंदा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला.
लोकक्रांती वृत्तांकन