टीम लोकक्रांती
श्रीगोंदा | दि.१६ मार्च २०२३ :
बुधवार दि.१५ मार्च २०२३ रोजीचे सायंकाळी ७ ते ८:४५ वा चे दरम्यान देऊळगांव गलांडे ता .श्रीगोंदा या गावच्या शिवारात देऊळगांव गलांडे ते मांडवगण रोडवर जयराम सटाले यांचे शेताजवळ रस्त्याचा अंदाज न आल्याने अज्ञात वाहनाने धडक दिल्याने पप्पु उर्फ दत्तात्रय भिवसेन धारकर वय २८ वर्षे रा. देऊळगांव गलांडे ता.श्रीगोंदा यांचा जागीच मृत्यू झाल्याची फिरीयाद श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये नोंदवण्यात अली.
मिळालेली माहितीअशी की मयत व्यक्ती हे फिटर असल्याने बजाज प्लॅटीना मोटारसायकल क्रमांक एम.एच.१६ सी.डब्ल्यु ०८१६ ही गाडी दुरुस्त करून गाडीची चक्कर मारण्यासाठी गेले असता घटनास्थळी कोणत्यातरी अज्ञात वाहनावरिल अज्ञात चालकाने भरधाव वेगाने व बेदरकारपणे रस्त्याची परिस्थीती नपाहता पप्पु उर्फ दत्तात्रय भिवसेन धारकर यांच्या मोटारसायकलीला जोराची धडक देवुन त्याच्या मृत्युस व मोटारसायकलीचे नुकसाणीस कारणीभुत झाला व त्यांना औषधोपचारासाठी दवाखान्यात न नेता व अपघाताची खबर न देता तो अज्ञात व्यक्ती तसाच निघुन गेला.
या घटनेने देऊळगाव गलांडे या गावावर शोककळा पसरली आहे गावातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त होत आहे.
श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे अंमलदार विकास वैराळ यांनी फिर्यादी सुनिल शिवाजी धारकर रा. देऊळगांव गलांडे यांच्या फिरीयादी वरून गुन्हा दाखल करून घेतला व पुढील तपास पोसई अमित माळी आणि पो.कॉ. वैभव गांगर्डे हे करत आहे.
लोकक्रांती वृत्तांकन