टीम लोकक्रांती
कोळगाव, श्रीगोंदा | दि.१६ मार्च २०२३ :
स्नेहसंमेलनामुळे मुलांच्या कलागुणांना वाव मिळतो. त्यांच्यातील उपजत व अंगी असलेले कला कौशल्य अशा स्नेहसंमेलनामुळे जोपासले जातात असे प्रतिपादन हेमंत नलगे यांनी श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे “साद सांजपाखरांची”वार्षिक स्नेहसंमेलनात बोलताना सांगितले. कार्यक्रमाचे उद्घाटन नागवडे कारखान्याचे माजी संचालक हेमंत नलगे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमित लगड, आजी-माजी सरपंच, सदस्य तसेच ग्रामस्थ व पालक यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाची सुरुवात देवा श्री गणेशा या गीताने करण्यात येऊन संपूर्ण कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, शेतकरीगीत, लावण्या, आईचा जोगवा, बालगीत, कोळीगीत इत्यादी अनेक गीतांचे विद्यार्थ्यांनी नृत्य सादरीकरण केले. उपस्थितांनी देखील प्रतिसाद देत चुमकल्यांवर कौतुकाची थाप टाकत त्यांना शुभेच्छा देत त्यांच्यावर बक्षिसांचा वर्षाव केला.
या कार्यक्रमासाठी गटशिक्षणाधिकारी अनिल शिंदे, विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर कलगुंडे, शिक्षक बँकेचे अध्यक्ष संदीप मोटे, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त रामदास ठाकर, नारायण लगड, केंद्र प्रमुख हारदे, संजय काळे, नारायण जठार,अनिल नलगे, भाऊसाहेब जगताप केंद्रातील व तालुक्यातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक तांबे, अजय लगड, विजय लगड, श्रीम.भंडारे मॅडम, श्रीम.नलगे मॅडम, श्रीम.पोटरे मॅडम, श्रीम.लोटके मॅडम, श्रीम.घाडगे मॅडम, यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्र संचालन विजय नलगे आणि सुहास चव्हाण यांनी केले.
लोकक्रांती वृत्तांकन