टीम लोकक्रांती
ढवळगाव, श्रीगोंदा | दि.१९ मार्च २०२३ :
शनिवारी दि. १८ मार्च २०२३ रोजी रात्री ०१:४५ वा. सुमारास ढवळगाव गावात चोरी करण्यासाठी चोरटे आले असल्याची माहिती माजी संरपच रवि शिंदे यांना मिळाल्याने त्यांनी लागलीच ही माहिती फोनवरुन ढवळगाव चौकात नाकाबंदी डयुटीसाठी असणारे सफौ/ मारुती कोळपे, पोकॉ / संपत गुंड व ढवळगावातील डयुटीवर असणारे पोलीस मित्र पांडूरंग बोरगे, महेंद्र लोंढे, बाळू शिंदे यांना कळविल्याने त्यांनी तात्काळ चोरटयांच्या दिशेने आपला मोर्चा वळविला तसेच ढवळगाव चौकात नाकाबंदी केली आता आपण पकडले जाणार या भितीने चोरटयांनी त्या गावातून अंधाराचा फायदा घेत तेथून पळ काढला. दि.१७ मार्च २०२३ रोजी बेलवंडी पोलीस स्टेशनला गुन्हे प्रतिबंधासाठी बैठक पोलीस स्टेशन स्तरावर आयोजित केली होती त्यामध्ये पो.स्टे. हददीतील गावा गावात ग्राम सुरक्षा पोलीस मित्र दल कार्यान्वित करण्यात आलेले होते.
पोलीस मित्रांच्या तत्परतेमुळे ढवळगाव मधील होणारा अनर्थ टळला त्यामुळे पो. नि. संजय ठेंगे यांनी सेवा निवृत्त सैनिक सेवापुर्ती सन्मान सोहळा कार्यक्रमात सत्कारमुर्ती सुभेदार संतोष दादाभाऊ शिंदे यांचा पोलीस स्टेशन तर्फे सत्कार करुन आयोजकाच्या परवानगीने सदर कार्यक्रमात नमूद पोलीस मित्र यांना पोलीस मित्राचे टी शर्ट, लाठी शिटी देऊन सन्मान केला. तसेच गावा गावातील तरूणांना पोलीसांनी मित्र होणे बाबत अवाहन केले त्यांनी सकारत्मक प्रतिसाद दिला तसेच ग्रामसुरक्षा यंत्रणेची माहिती गावकऱ्यांना देऊन सतर्क केले. तसेच प्रत्येक गावातील मेन चौकात सी.सी. टी.व्ही. बसविणे बाबत अवाहन केले.
उपस्थितीत असलेल्या लोकप्रतिनिधीना त्यांचे गावा गावात १५ व्या वित्त आयोगातून किंवा ग्राम निधीतून सी.सी.टी.व्ही बसविणे बाबत तसेच वाडया वस्तीवर सी.सी.टी.व्ही बसविणे बाबत जनजागृती तसेच ग्रामसुरक्षा यंत्रना चालू करणे बाबत अवाहन केले त्याना उपस्थितीत नागरिकांनी सकारत्मक प्रतिसाद दिला.
तसेच बेलवडी पोलीस स्टेशन हददीतील ४८ गावातील माजी सैनिकांना पो.नि.संजय ठेंगे यांनी सदर पोलीस मित्र होणे बाबत अवाहन केले असता संदिप सांगळे अध्यक्ष त्रिदल सैनिक संघ श्रीगोंदा यांनी आमची संघटना सकारत्मक असले बाबत कळविले.
लोकक्रांती वृत्तांकन