श्रीगोंद्यात दूध भेसळ प्रकरणी पाचजण अटकेत; मुख्य आरोपी मात्र फरार.. पोलीसांकडून शोध सुरू!

टीम लोकक्रांती
श्रीगोंदा | दि.२१ मार्च २०२३ :
दुधात केमिकल कालवून सर्वसामान्यांच्या आरोग्यासाठी घातक असणारे दूध भेसळ प्रकरण समोर आले आहे. हा अवैध व्यवसाय करणाऱ्या श्रीगोंदा तालुक्यातील या प्रकरणातील पाच आरोपींना श्रीगोंदा पोलीसांनी शोध घेऊन ताब्यात घेतले आहे तर एक आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

सविस्तर माहिती अशी की बाळासाहेब बाबुराव पाचपुते, रा. वांगदरी रोड, संतवाडी, काष्टी याने Whey permeate powder व Light Liquid Paraffin च्या सहायाने विनापरवाना कृत्रीम मानवी आरोग्यास धोका पोहचेल असे भेसळयुक्त दुध बनविण्यासाठी त्याचा वापर करुन लोकांची फसवणुक करुन सदर दुधाची स्वतःचा आर्थीक फायदा मिळवण्याचे उददेशाने विक्री करत असल्याचे अन्न व सुरक्षा अधिकारी म.राज्य यांना दिनांक १६/०३/२०२३ रोजी आढळून आल्याने उमेश राजेंद्र सुर्यवंशी, अन्न व सुरक्षा अधिकारी, अन्न व औषध प्रशासन विभाग, अहमदनगर यांनी श्रीगोंदा पोलीस ठाणे येथे हजर राहुन दिलेले फिर्यादी वरुन श्रीगोंदा पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि नं ३०३/२०२३ भा.द.वि कलम २७२,२७३,३२८, ४२० अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ चे क २६ (१), २६ (२)(i) प्रमाणे दिनांक – १७/०३/२०२३ रोजी गुन्हा दाखल केला होता.

ह्या गुन्हयातील आरोपी बाळासाहेब बाबुराव पाचपुते हा गुन्हा दाखल झाले पासुन फरार आहे. सदर आरोपीस भेसळयुक्त दुध तयार करण्यासाठी लागणारे पदार्थ पुरविणारा व प्रथम खबर अहवालामध्ये नाव असणारा व्यक्ती संदिप संभाजी मखरे, रा. मखरेवाडी, ता. श्रीगोंदा याचा शोध घेवून त्यास दिनांक १८/०३/२०२३ रोजी अटक केली आहे. पोलीसांनी त्यांचेकडे विचारपुस केली असता त्याने तो स्वत: भेसळयुक्त दुध तयार करत असल्याची माहीती दिली असुन त्याने श्रीगोंदा व परीसरातील काही लोकांना भेसळयुक्त दुध तयार करण्यासाठी लागणारे पदार्थाची विक्री केली असल्याचे सांगत आहे. आरोप संदिप मखरे याने सांगीतले प्रमाणे तो दुध भेसळ करणे करीता लागणारे पदार्थ
१) वैभव रामदास राऊत, वय. २५ वर्षे, रा. बोरुडेवाडी, ता. श्रीगोंदा,
२)दिपक विठठल मखरे, वय.३२ वर्षे, रा. मखरेवाडी, ता. श्रीगोंदा,
३) निलेश तुकाराम मखरे, वय.३२ वर्षे, रा. मखरेवाडी, ता. श्रीगोंदा,
४) संदिप बबन राऊत, वय.३६ वर्षे, रा. बोरुडेवाडी, ता. श्रीगोंदा यांना पुरवत असल्याचे सांगुन सदरचे इसम स्वतः भेसळयुक्त तयार करत असल्याचे सांगीतल्याने नमुद इसमांकडे चौकशी करुन त्यांना सदर गुन्हयात अटक केली असुन गुन्हयाचा तपास चालु आहे.

ह्या गुन्हयाचा तपास पोलीस अधिक्षक अहमदनगर राकेश ओला साहेब, अपर पोलीस अधिक्षक अहमदनगर प्रशांत खैरे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग अण्णासाहेब जाधव साहेब, यांचे मागदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले व पोलीस उप निरीक्षक समिर अभंग हे करीत असुन सदरहु गुन्हयाचे तपासकामी गुन्हे शोध व प्रकटीकरण शाखा, श्रीगोंदा चे कर्मचारी सफौ ढवळे, पोना इंगवले, पोकॉ कोतकर, पोकॉ देवकाते, पोकॉ साने, पोकॉ रवि जाधव हे मदत करीत आहेत.
लोकक्रांती वृत्तांकन

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
overcast clouds
23.4 ° C
23.4 °
23.4 °
80 %
8.4kmh
100 %
Sun
23 °
Mon
28 °
Tue
25 °
Wed
24 °
Thu
28 °
error: Content is protected !!