कोळगाव बसस्थानक उद्घाटनाच्या प्रतीक्षेत!

खासदारांची तारीख मिळत नसल्याने प्रवाशांची गैरसोय

टीम लोकक्रांती
कोळगाव, श्रीगोंदा | दि.२५ मार्च २०२३ :
कोळगाव ता. श्रीगोंदा येथील नवीन बस स्टॅन्ड ची उभारणी सप्टेंबर २०२२ मध्येच पूर्ण झालेली असतानाही खासदार सुजय विखे पाटील यांची उद्घाटनासाठी तारीख मिळत नसल्याने हे बस स्थानक उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असून प्रवाशांची गैरसोय निर्माण करणारे ठरले आहे.

कोळगाव येथील बस स्थानक पळसा नदीच्या गावाकडील बाजूस असून सार्वजनिक बांधकाम विभागाने दक्षिण नगरचे खासदार सुजय विखे पाटील यांच्या स्थानिक निधीतून सन २०१९-२० सालामध्ये मंजूर केले. या बस स्थानकाची उभारणी १४ मार्च २०२२ रोजी सुरू करण्यात आली व ८ सप्टेंबर २०२२ रोजी बस स्थानकाचे काम पूर्ण झाले. त्यासाठी एकूण दहा लाख रुपये खर्च आला.

सदर बस स्थानकाचे काम संबंधित ठेकेदाराकडे वारंवार पाठपुरावा करून वेळेत पूर्ण करून घेतले आहे. लवकरच खा. सुजय विखे यांची तारीख घेऊन उद्घाटन करणार आहे – माजी सभापती पुरुषोत्तम लगड

आकर्षक असे बस स्थानक उभारूनही प्रवाशांना मात्र बसची वाट पाहत शेजारील दुकानदाराच्या समोर बसावे लागते. पर्यायाने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. लांब पल्ल्याच्या काही बसेस या कोळगाव फाट्यावरूनच पुढे निघून जातात. तर गावात येणाऱ्या बसेस बस स्थानकासमोर उभ्या न राहता स्थानकासमोरून गोल चक्कर मारून प्रवाशांना काही अंतरावर रस्त्याच्या कडेलाच बसवून घेतात. काम पूर्ण होऊनही खा. सुजय विखे यांचे उद्घाटनासाठी तारीख मिळत नसल्याने अजून किती काळ प्रवाशांना उद्घाटनाच्या प्रतीक्षेत ताटकळत बसावे लागणार आहे हे येणारा काळच ठरवणार आहे.
लोकक्रांती वृत्तांकन

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
moderate rain
23.7 ° C
23.7 °
23.7 °
85 %
7.1kmh
100 %
Sat
23 °
Sun
25 °
Mon
27 °
Tue
25 °
Wed
25 °
error: Content is protected !!