वडिलांची शिक्षणाविषयी असलेल्या तळमळी मुळे; स्मृती दिनानिमित्त त्यांच्या मुलांनी शाळेस दिला व्हाईट बोर्ड भेट!

टीम लोकक्रांती : श्रीगोंदा दि.२९ ऑगस्ट २०२२ :  सिद्धार्थनगर, येथील कालकथित सत्यवान काशिनाथ घोडके यांचे स्मृती दिनानिमीत्त त्यांचे कुटुंबियांनी सिद्धार्थनगर च्या जिल्हा परिषद शाळेस व्हाईट बोर्ड भेट देवून वडीलांच्या स्मृती जागवल्या. शाळेचे मुख्याध्यापक संदीप मोटे यांनी ही भेट वस्तू त्यांच्या पत्नी चांगुणाबाई, मुले भारत व शरद तसेच, कन्या मनिषा व सोनिया यांच्या हस्ते स्विकारली.

त्यांची मुले शरद व भारत यांनी, अडानी असलेल्या वडीलांना मात्र शिक्षणाविषयी खुप तळमळ असल्याने आंम्ही ही शैक्षणिक वस्तू शाळेस भेट दिली व यापुढेही प्रत्येक स्मृतीदिनी शाळेसाठी निश्चितच भेटवस्तू देवून, त्यांच्या विचारांच्या स्मृती जागवू असे सांगितले.

यावेळी प्रसिद्ध व्याख्याते प्रशांत चव्हाण सर यांनी भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेले पंचशिल उपस्थितांना समजावण्याचा प्रयत्न आपल्या व्याख्यानातून केला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बौद्धाचार्य धोंडीभाऊ घोडके हे होते.

यावेळी नगराध्यक्षा शुभांगीताई पोटे, नगरसेवक निशुभाई बेपारी, प्रशांत गोरे, संतोष कोथिंबीरे, संतोष क्षीरसागर, अशोक खेंडके, शहाजी खेतमाळीस, सोनाली ह्रदय घोडके व उपनगराध्यक्ष संग्राम घोडके आदिंसह मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

कार्यक्रमाचा धार्मिक विधी आनंद घोडके यांनी पार पाडला. तर, सुत्रसंचालन चंपालाल घोडके यांनी केले व आभार पो.कॉ.ह्रदय गौतम घोडके यांनी मानले.
स्त्रोत:आयोजित कार्यक्रम

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
overcast clouds
25.1 ° C
25.1 °
25.1 °
81 %
8.5kmh
100 %
Wed
26 °
Thu
29 °
Fri
29 °
Sat
29 °
Sun
29 °
error: Content is protected !!