टीम लोकक्रांती
श्रीगोंदा, दि.३० मार्च २०२३ :
गुरुवार दि.३० मार्च रोजी वडाळी येथून ‘परिवर्तन संवाद यात्रेची’ सुरुवात राष्ट्रवादीचे आ. निलेश लंके यांच्या उपस्थितीत झाली. मागील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार घनश्याम शेलार यांची आमदारकीची संधी थोडक्यात हुकली. मात्र या विधानसभा निवडणुकीत या ‘परिवर्तन संवाद यात्रेने’नक्कीच परिवर्तन होईल व राष्ट्रवादीचा आमदार झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार यांच्या परिवर्तन संवाद यात्रेचा शुभारंभ आ. लंके यांनी राष्ट्रवादीचा झेंडा फडकवून केला. यावेळी बोलताना आ. लंके म्हणाले, शेलार यांचा जनसंपर्क दांडगा आहे. शिवाय त्यांना सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार राहुल जगताप म्हणाले, राष्ट्रवादीच्या माध्यमातून शेलार यांचे काम सुरू आहे. शेलार यांच्या संवाद यात्रेत सर्वांनी मोठ्या संख्येने सामिल व्हावे असे आवाहन केले व शुभेच्छा दिल्या.
यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हरिदास शिर्के, शहराध्यक्ष भाऊसाहेब खेतमाळीस, संजय आनंदकर, श्रीपाद ख्रिस्ती, मीनल भिंताडे, श्याम जरे, सतीश जामदार, गोरख घोडके यांची भाषणे झाली. वडाळीचे माजी सरपंच रवींद्र काटे यांनी सूत्रसंचालन केले तर उपसरपंच नानासाहेब काळे यांनी आभार मानले.
लोकक्रांती वृत्तांकन