वाईट प्रवृत्तींना दूर करण्यासाठी वेळीच लगाम घालण्याची गरज आमदार बबनराव पाचपुते

बाजार समिती निवडणूक पार्श्वभूमीवर नागवडे - पाचपुते गटाचा शेतकरी मेळावा

टीम लोकक्रांती
लिंपणगाव, श्रीगोंदा | दि.१४ एप्रिल २०२३ : श्रीगोंदा तालुक्याच्या राजकारणात काही वाईट प्रवृत्तीच्या व्यक्तींनी धुडगूस घालत बनवाबनवी करून गावोगावी दूषित वातावरण करत आहेत. त्यांना वेळीच लगाम घालण्याची नितांत गरज असल्याचे प्रखर मत आमदार बबनराव पाचपुते यांनी श्रीगोंदा येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात व्यक्त केले आहे.

श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक पार्श्वभूमीवर आमदार बबनराव पाचपुते, राजेंद्र नागवडे, बाबासाहेब भोस यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा येथे विविध संस्था पदाधिकाऱ्यांचा भव्य शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते हे होते.

यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आमदार पाचपुते पुढे म्हणाले की, बाजार समितीची निवडणूक शेवटच्या टप्प्यावर आलेली आहे. बाजार समितीला खरे रूप दाखवण्यासाठी या निवडणुकीत पक्षविरहित आम्ही योग्य चर्चा केलेली आहे. सद्यस्थिताीला राजकारणाची दिशा बदलत असताना वाईट प्रवृत्तींनी चांगल्या संस्थेत राजकारण करत धुडगूस सुरू केलेला आहे. असे सांगून आमदार पाचपुते पुढे म्हणाले की ४० वर्ष आपण राजकारण करत असताना असे गलिच्छ राजकारण कधी केले नाही. शिवाजीराव नागवडे बापू मी एकमेकांच्या विरोधात उभे राहिलो. परंतु तिथेच आम्ही एकमेकांच्या सुखदुःखात कायम राहिलो मनभेद कायम ठेवले आता ती परिस्थिती तालुक्यात राहिलेली नाही. मोकळ्या मनाने आम्ही एकत्र आलेलो असून, कार्यकर्त्यांनी गडबडून जाण्याचे कारण नाही. राजेंद्र नागवडे, बाबासाहेब भोस, आणि मी या निवडणुकीत जो उमेदवार देतील त्याचे प्रामाणिकेपणे काम करावे भरघोस मतांनी उमेदवार निवडून आणावेत निश्चितपणे जिल्ह्यात बाजार समितीचा आदर्शवत असा कारभार करू, मी फुटणार नाही आणि कुणालाही फूटू देणार नाही, अशी शपथ यावेळी प्रत्येक कार्यकर्त्यांना देऊन माफक सल्लादेखील आमदार पाचपुते यांनी यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना दिला.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस यावेळी म्हणाले की, चांगल्या संस्थेत राजकारण नको, म्हणून आम्ही दोन महिन्यापूर्वी खरेदी-विक्री संघाची निवडणूक सर्व पक्षांनी एकत्रित बिनविरोध करण्याची संकल्पना मांडली. त्याला सर्वांनीच पाठिंबा दिला परंतु त्या निवडणुकीत देखील दृष्ट प्रवृत्तीच्या लोकांनी गद्दारी केली. आणि आमचे उमेदवार या निवडणुकीत पराभूत केले. त्याच क्षणी आमच्या लक्षात आले तालुक्यातील या दृष्ट प्रवृत्तींना दूर ठेवावे लागेल. असे सांगून भोस पुढे म्हणाले की, शब्दाला तिलांजली देणाऱ्यांबरोबर कोणत्याच निवडणुकीत युती नको. असा संकल्प आम्ही सर्वांनी केला. असे सांगून ते पुढे म्हणाले की आमदार पाचपुते यांच्या बोटाला धरून ज्यांना अनेक पदे मिळाली त्यांनीदेखील आमदार पाचपुते यांचा विश्वासघात केला. यापुढे या दृष्ट प्रवृत्तीच्या हातात बाजार समितीची सूत्रे दिल्यास निश्चितपणे बाजार समितीला टाळे ठोकावे लागतील. त्यामुळे सभासदांनी आमदार पाचपुते, राजेंद्र नागवडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीचा बदला या निवडणुकीच्या माध्यमातून घ्यावा लागणार आहे. विरोधकांनी देखील आता स्वतःची ताकद या निवडणुकीत दाखवावी अन्यथा आम्ही तरी आमची ताकद दाखवून देऊ असा इशाराही भोस यांनी यावेळी दिला.

यावेळी नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे यावेळी बोलताना म्हणाले की, तालुक्याच्या जडणघडणीत खऱ्या अर्थाने आमदार पाचपुते व शिवाजीराव नागवडे बापू यांनी सर्वसामान्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी रात्रंदिवस कष्ट घेतले. आधार देण्याचे काम केले. मात्र काही दृष्ट प्रवृत्तीच्या लोकांनी स्वार्थ साधण्यासाठी कधी बापू तर कधी आमदार पाचपुते यांचा आधार घेऊन तालुक्यात बनवाबनवी चे राजकारण केले. नुकत्याच खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत विश्वासघात करून गलिच्छ राजकारण केल्यामुळे सर्वसामान्य माणूस संतापले आहेत. बाजार समितीच्या निवडणुकीत मतदारांना अमिष दाखविण्याचा प्रयत्न होणार आहे. त्याला कोणीही बळी पडू नये, असे सांगून नागवडे पुढे म्हणाले की तालुक्याचे राजकारण दूषित करण्यासाठी नहाटा यांनी कधी पवार, विखे व आम्हाला फक्त स्वार्थासाठी जवळ केले. त्यामुळे आम्ही वेळीच सावध होऊन सर्वांनी या दृष्ट प्रवृत्तींना बाजूला करण्यासाठी एकत्र आलो आहोत. सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी एकसंघ आहोत. प्रत्येकाला गंडा घालणाऱ्या व्यक्तींना या निवडणुकीच्या माध्यमातून दूर करण्यासाठी आम्ही हा एक मताने निर्णय घेतला असल्याचे नागवडे यांनी सांगितले.

यावेळी प्रामुख्याने दत्तात्रय पानसरे, बंडोपंत पंधरकर, प्रकाश बोरुडे, कातोरे, पोपटराव खेतमाळीस, रामदास झेंडे, अरुणराव पाचपुते, अॅड. बाळासाहेब काकडे, अॅड. डी डी घोरपडे, भगवानराव पाचपुते आदींनी मनोगत व्यक्त करत विरोधकांचा चांगला समाचार घेतला.

या मेळाव्यास भगवानराव पाचपुते, अरुणराव पाचपुते, आदेश नागवडे, प्रतापसिंह पाचपुते, दिनकर पंधरकर, प्रेमराज भोईटे, पुरुषोत्तम लगड, कुंडलिक दरेकर, नंदकुमार कोकाटे, संतोष लगड, डी डी घोरपडे, मनोहर पोटे, स्मितल वाबळे, धनसिंग भोईटे, गणपतराव काकडे, योगेश भोईटे आदींसह पाचपुते नागवडे गटाचे असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते प्रास्ताविक दत्तात्रय पानसरे यांनी केले तर सूत्रसंचालन धर्मनाथ काकडे यांनी केले उपस्थित कार्यकर्त्यांचे प्रतापसिंह पाचपुते आभार यांनी मानले.
लोकक्रांती वृत्तांकन

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
overcast clouds
23.4 ° C
23.4 °
23.4 °
85 %
7.2kmh
85 %
Sun
23 °
Mon
28 °
Tue
25 °
Wed
26 °
Thu
28 °
error: Content is protected !!