टीम लोकक्रांती : श्रीगोंदा दि.२९ ऑगस्ट २०२२ : पुणे येथे दिनांक २८ ऑगस्ट २०२२ रोजी भव्य पारंपारिक वाद्य व सनई ताफा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये श्रीगोंदा तालुक्यातील ढवळगाव येथील बापू शिंदे यांना ताशा सम्राट पुरस्काराने प्रथम क्रमांकाने सन्मानित करण्यात आले.तळवडे येथे लोकशाहीर डॉक्टर आण्णाभाऊ साठे जयंतीच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हास्ते पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला त्या मध्ये श्रीगोंदा तालुका तील ढवळगाव गावचे सुपुत्र बापू शिंदे यांना लोकशाहीर आण्णाभाऊ साठे सम्राट जीवनगौरव पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.पुरस्काराचे स्वरूप स्मृतीचिन्ह,शाल,श्रीफळ असे होते.
माननीय अविनाश बागवे साहेब मातंग एकता आंदोलन महाराष्ट्र राज्य,कार्याध्यक्ष पिंपरी चिंचवड महानगरपालिका च्या पंकज भालेकर, हलगी सम्राट केरबा पाटील फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष के.के.आल्हाट सर,बहुजन विकास महासंघ महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अनिल शिंदे,जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष दत्तू चव्हाण,राजु चव्हाण,संतोष नेटके सर,इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.
बापू शिंदे ढवळगाव येथील सर्वसामान्य कुटुंबातील आहेत त्यांना आतापर्यंत विविध संस्थेचे सन्मान मिळाले आहेत व त्यांनी अनेक स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवले आहेत.
स्त्रोत-आयोजित कार्यक्रम