टीम लोकक्रांती
श्रीगोंदा, लिंपणगाव | दि.१७ एप्रिल २०२३ :
रामदास फटाकडे सर जिल्हा उपाध्यक्ष शिक्षक भारती संघटना अहमदनगर यांना शिवसेना नाशिक जिल्हा यांच्या वतीने उत्तर महाराष्ट्र क्रीडा रत्न पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन माजी मंत्री व विद्यमान आमदार राज्याचे नेते सन्माननीय बबनराव पाचपुते साहेब अहमदनगर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र दादा नागवडे साहेब तसेच शिक्षक आमदार कपिल पाटील साहेब पदवीधर आमदार सत्यजित तांबे साहेब राज्य अध्यक्ष अशोकराव बेलसरे सर संस्थेचे अध्यक्ष प्रतापसिंह पाचपुते साहेब संस्थेचे सचिव सन्माननीय भोसले साहेब मुख्याध्यापक पवार जेडी सर ग्रामस्थ स्कूल कमिटी चे चेअरमन सर सदस्य शिक्षक भारती संघटनेचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप व सर्व शिक्षक भारती संघटनेचे पदाधिकारी व सदस्य सर्व शिक्षक शिक्षकेतर संघटना यांचे पदाधिकारी शिक्षक बंधू भगिनी संस्थेतील सर्व सहकारी यांनी अभिनंदन केले.
रामदास फटाकडे सर यांनी श्रीगोंदा तालुक्यामध्ये गेली २८ वर्ष क्रीडा क्षेत्रामध्ये योगदान दिले श्रीगोंदा तालुक्याचे तालुका क्रीडा संघटनेचे तालुकाध्यक्ष म्हणून त्यांनी पद भूषवले विविध स्पर्धांचे आयोजन नियोजन त्यांनी यशस्वीपणे पार पाडले विद्यालयामध्ये अनेक विद्यार्थी त्यांनी घडवण्याचे काम केले तालुका पातळीवर जिल्हा पातळीवर राज्य पातळीवर त्यांचे विविध विद्यार्थी चमकले त्यांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्याचा फायदा झाला त्याचबरोबर फटाकडे सरांनी सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये अविरतपणे काम केले करत आहेत शाळा इमारत असेल गावातील काही सामाजिक कार्यक्रम असतील सांस्कृतिक कार्यक्रम असतील याच्यामध्ये हिरीरीने भाग घेतला यशस्वी सहभाग घेऊन सगळीकडे मदत करण्याचे काम केले विद्यालयामध्ये क्रीडांगण वृक्षारोपण कंपाऊंड अशा अनेक कामांमध्ये सक्रिय सहभाग घेतला विद्यालयाचे क्रीडा विभागाचे नाव उंचवण्याचे काम त्यांनी नेहमीच केले. याची दखल घेऊन त्यांना उत्तर महाराष्ट्र क्रीडा रत्न पुरस्कार जाहीर झाला
लोकक्रांती वृत्तांकन