टीम लोकक्रांती
श्रीगोंदा | दि.२० एप्रिल २०२३ :
तालुक्यातील मढेवडगांव येथील न्यु इंग्लिश स्कुलच्या क्रिडा शिक्षिका अर्चना कोरडे-कुतवळ यांना क्रिडा क्षेत्रातील योगदानाबद्दल उत्तर महाराष्ट्र क्रिडा रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
अर्चना कोरडे या रयत शिक्षण संस्थेच्या मढेवडगांव येथील न्यु इंग्लिश स्कुलमध्ये क्रिडा शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयातील विद्यार्थ्यांनी जिल्हा पातळीवरील व विभागीय पातळीवरील क्रिडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगीरी केली आहे. नाशिक जिल्हा शिवसेनेच्यावतीने देण्यात येणारा उत्तर महाराष्ट्र क्रिडा रत्न पुरस्कार कोरडे-कुतवळ यांना नुकताच जाहीर झाला आहे.या पुरस्काराचे वितरण १ मे महाराष्ट्र दिनी नाशिक येथे करण्यात येणार आहे.
अर्चना कोरडे- कुतवळ यांना पुरस्कार जाहीर झाल्यानंतर विद्यालयातील शिक्षक व पालकांनी त्यांचा सत्कार केला. या पुरस्काराबद्दल कोरडे-कुतवळ यांचे विद्यालयाचे मुख्याध्यापक भार हिंगसे,पर्यवेक्षक विलास सुलाखे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा नंदिनी वाबळे यांच्यासह सहकारी सेवक वृंदाने अभिनंदन केले आहे.
लोकक्रांती वृत्तांकन