टीम लोकक्रांती
श्रीगोंदा | दि.२६ एप्रिल २०२३ :
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार यांनी २५ एप्रिल रोजी वाढदिवसाचे औचित्य साधून पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी सुरू केलेल्या परिवर्तन संवाद यात्रेत लोकांच्या समस्यांचे अनुभव सांगितले. १ मे महाराष्ट्र दिनी हॅलो आण्णा नावाचे मोबाईल ॲप्सचे अनावरण करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या ॲपद्वारे जनतेच्या समस्या सोडवण्याचे काम सुलभ होणार असल्याचे ते म्हणाले.
३० मार्च रोजी परिवर्तन संवाद यात्रेला सुरुवात केली श्रीगोंदा/नगर तालुक्यातील जवळपास १२० गावांमध्ये जाऊन समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. अजून काही गावे बाकी आहेत. वीज, पाणी, रस्ते हे प्रश्न गेली ४० वर्षापासून जाग्यावरच आहेत तरुणांना रोजगार नाहीत लोक प्रकर्षाने व्यथा मांडत होते घोड लाभक्षेत्राची एकेकाची सोबत आता संपुष्टात आलेली जाणवले मर्यादीत भागालाच पाणी मिळत आहे तुकडीच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो. सध्याचे प्रश्न प्रामुख्याने कांद्याचे भाव,अतिवृष्टी, सततच्या पावसाने झालेले नुकसान विजेचा मोठा प्रश्न असे अनेक समस्यांवर लोक बोलत होते.
या सर्व समस्या बाबतीत आमदारांना कसलेच गांभीर्य नाही असा आक्षेप लोकांकडून होत आहे तसेच लोकप्रतिनिधी सक्रिय नाहीत त्यांचा प्रशासनावर कसलाच अंकुश नाही अशी नाव न घेता आमदार बबनराव पाचपुते यांच्यावर घनश्याम शेलार यांनी टीका केली.
मंजूर झालेल्या निधीचे फक्त आकडे वाचायला मिळतात परंतु दर्जेदार कामे होताना कुठे दिसत नाही. वीज, पाणी, रस्ते या प्रश्नावर ३७ वर्षापासून काम करणारा मी एक सामान्य कार्यकर्ता कुठलेही पद नसताना सर्वसामान्यांचे अडीअडचणी सोडण्याचे काम केले. विरोधी पक्ष आहे म्हणून मी हातावर हात धरून बसणार नाही परंतु ज्यांच्याकडे जबाबदारी आहेत त्यांनी जनतेचे कामे करावीत.
१ मे पासून ‘हॅलो आण्णा’ हे ॲप लॉन्च करणार लोक त्यांचे प्रश्न मोबाईल वरून सांगणार त्या कामाचे मेसेज परत त्यांना जाणार व ॲपवरती नोंद राहणार तुम्ही हॅलो म्हणा मी आलो म्हणतो’ अशी नवीन संकल्पना घेऊन लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी येत आहे थोडक्यात कंपलेंट बॉक्स चे काम या ॲपच्या माध्यमातून करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
लोकक्रांती वृत्तांकन