टीम लोकक्रांती
श्रीगोंदा | दि. २८ एप्रिल २०२३ :
महाराष्ट्रातील तमाम लावणी प्रेमींना आपल्या तालावर थिरकवणारी अल्पावधीतच लोकप्रियतेचे शिखर गाठलेली लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटिल हिचा लावणी महोत्सव व आर्केस्ट्राचा भव्य कार्यक्रम श्रीगोंदा शहरात दिनांक ३ मे २०२३ रोजी सायंकाळी ७:०० वाजता आयोजीत करण्यात आला आहे. याबाबत आयोजकांनी आज श्रीगोंदा येथे पत्रकार परिषदेत माहिती दिली.
त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देताना सांगीतले की, सदरील कार्यक्रम सामजिक भावनेतून घेतं असुन, यातुन विधायक कार्य पुर्ण करण्यात येणार आहे. मागासर्गीय समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाचे बांधकाम करण्यात येत असुन, त्यासाठी लागणाऱ्या निधीच्या पूर्तर्तेसाठी नमूद कार्यक्रम यशस्वी करण्याचा प्रयत्न आहे. लहुजी समाज सेवा मंडळाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमासाठी हजारोंच्या संख्येने प्रेक्षक उपस्थित राहणार असल्याचा विश्वास असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भगवान आबा गोरखे यांनी सांगीतले की, सदरील कार्यक्रम अतिशय नियोजपूर्वक व शांततेत पूर्ण होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रशासकिय परवानग्या पुर्ण करण्यात आल्या आहेत. आणि चोख बंदोबस्ता बरोबरच बोंसरच्या माध्यमातून कार्यक्रमाला कोठेही गालबोट लागू नये याची खबरदारी घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचा महिलांना ही आनंद घेता यावा यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे.
या कार्यक्रमाचे आयोजक भगवान गोरखे हे असुन, सौजन्य आप्पासाहेब सोनवणे व राजुशेठ कोथंबिरे हे आहेत. नमूद कार्यक्रमाचा ५००/-, ३००/-, २००/- रुपये तिकीट दर निश्चित करण्यात आला असून, भगवान गोरखे, मीराताई शिंदे, मुकूंद सोनटक्के, सत्यवान शिंदे व प्रशांत शिंदे यांच्याशी तिकीट व इतर मदतीसाठी संपर्क करण्याचे आवाहन आयोजक गोरखे यांनी केले आहे.
नमूद पत्रकार परिषदेसाठी भगवान आबा गोरखे, भाऊसाहेब गलांडे, मीराताई शिंदे, नंदुभाऊ ससाणे, विनायक मोरे सह पदाधिकारी उपस्थित होते.
लोकक्रांती वृत्तांकन