टीम लोकक्रांती
श्रीगोंदा | दि.३० एप्रिल २०२३ :
श्रीगोंद्याची सुवर्णकन्या आंतरराष्ट्रीय पैलवान भाग्यश्री फंड हिने महाराष्ट्रातील पहिली महाराष्ट्र केसरी बनण्याचा मान मिळवला आहे श्रीगोंदयाच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवला यानिमित्ताने श्रीगोंदा येथे तिचे जंगी स्वागत व मिरवणूक काढण्यात आली व शेख महंमद महाराज पटांगणात भव्य सत्कार करण्यात आला या दरम्यान तिचे वडील मेजर हनुमंत फंड आई सौ पूजा हनुमंत फंड, नातेवाईक व शहरातील मान्यवर, पै.आप्पासाहेब सोनवणे व त्याचे सहकारी तसेच कुस्ती प्रेमी हे मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
सविस्तर वृत्त असे की कोल्हापूर येथे पार पडलेल्या २५ ते २७ एप्रिल २०२३ दरम्यान अस्थाई समिती आयोजित पहिली महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडली झालेल्या स्पर्धेमध्ये इंटरनॅशनल कुस्ती संकुल तालमीमधील मुलींनी घवघवीत यश मिळविले त्यामध्ये ओपन गटामध्ये श्रीगोंदा तालुक्याचे अहमदनगर जिल्ह्याची सुवर्णकन्या पैलवान भाग्यश्री फंड हीची पहिली कुस्ती मुंबई ची वैष्णवी पाटील सोबत सेमी फायनल मध्ये सांगली ची प्रतिक्षा बागडे सोबत तर फायनल मध्ये कोल्हापूर ची अमृता पूजारी सोबत प्रक्षणीय अतीतटीच्या कुस्त्या करत मानाची पहिली महिला महाराष्ट्र केसरी किताब मानाची गदा व अल्टो के१० गाडी मिळविली व अहमदनगर जिल्ह्याला व श्रीगोंदा तालुक्याला पहिली महिला महाराष्ट्र केसरी मिळवून दिली.
तसेच बाकीच्या गटामध्ये उल्लेखनीय कामगिरी करत खेळाडूंनी संपन्न केले पैलवान वेदांतिका पवार ७२ किलो सातारा गोल्ड मेडल व स्कुटी जुपेटर गाडी, पैलवान श्रुखला रतनपारखी ६५ किलो संभाजीनगर गोल्ड मेडल व स्कुटी जुपेटर गाडी पैलवान धनश्री फंड ५५ किलो अहमदनगर गोल्ड मेडल व स्कुटी जुपेटर गाडी पैलवान पल्लवी पोटफोडे ६५ किलो पुणे सिल्वर मेडल, पैलवान साक्षी इंगळे ५० किलो पुणे ब्रांझ मेडल, पैलवान सोनिया सरक ६२ किलो सोलापूर ब्रांझ मेडल
या सर्व यशाचे श्रेय गुरुवर्य आंतरराष्ट्रीय पंच दिनेश गुंड सर, अहमदनगर जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष वैभव लांडगे, श्रीगोंदा तालुका तालीम संघाचे अध्यक्ष उपमहाराष्ट्र केसरी संदीप भाऊ बारगुजे, पै. उद्योजक आप्पा सोनवणे, भाग्यश्री चे आजोबा नामदेव फंड, उद्योजक बापू निंभोरे सर्व भाग्यश्री चे हितचिंतक पैलवान मित्र परिवार यांना दिले.
सर्व यशस्वी खेळाडूंचे तालुक्याचे आमदार बबनराव पाचपुते साहेब,रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य बाबासाहेब भोस, माजी आमदार राहुल जगताप, श्रीगोंदा सहकारी कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे , प्राचार्य डॉ ज्ञानदेव म्हस्के , विशेष आर्थिक सहाय्य करणारे अरुण आनंदकर, उद्योजक बाळासाहेब रावत पुणे, विजय बोरुडे तहसीलदार कोपरगाव, पै आप्पासाहेब सोनवणे, समस्त ग्रामस्थ श्रीगोंदा, टाकळी लोणार, नगराध्यक्ष, सर्व नगरसेवक, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य इंटरनॅशनल कुस्ती संकुल तालीमचे सर्व मित्र परिवार यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
भाग्यश्री व सर्व विजयी खेळाडूंना मेजर हनुमंत फंड कोच समाधान खांडेकर सर, क्रीडा संजय डफळ, पै राहुल पाचपुते, पै पिंटू पवार याचे मार्गदर्शन मिळाले.
लोकक्रांती वृत्तांकन