टीम लोकक्रांती
श्रीगोंदा | दि.४ मे २०२३ :
दि.३ मे रोजी श्रीगोंदा शहरामध्ये गौतमी पाटीलचा कार्यक्रम लहुजी समाज सेवा मंडळातर्फे आयोजित करण्यात आला होता मागासवर्गीय विद्यार्थ्यांना वस्तीगृह बांधण्यासाठी निधी संकलनाचा शुद्ध हेतूने भगवानराव गोरखे व त्यांचे सहकाऱ्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता परंतु रसिकांनी या कार्यक्रमाला पाठ फिरवल्याचे चित्र यावेळी दिसले.
कार्यक्रमाची वेळ सायंकाळी आठ वाजता होती परंतु कार्यक्रम उशिराने सुरू झाल्याने तिकीट खरेदी करून आलेले सुरुवातीचे प्रेक्षक नाराज झाले दरम्यानच्या काळात कंपाउंड बाहेरून दगड फेक झाल्याने काही काळ तणाव निर्माण झाला. पोलिसांच्या सतर्कतेने वातावरण सुरळीत झाले.
तिकीट खरेदी करून आलेले प्रेक्षक यांना विना तिकीट आलेल्या हुल्लडबाज तरुणांच्या त्रासास सामोरे जावे लागले व मनस्ताप सहन करावा लागला अक्षरशः उभा राहून कार्यक्रम पाहण्याची वेळ प्रेक्षकांवर अली त्यामुळे काही प्रेक्षक अर्ध्यावरूनच कार्यक्रम सोडून निघून गेले गौतमी पाटील चा डान्स सुरू होताच या तरुणांनी स्टेज समोर अक्षरशः धुमाकूळ घातला यावेळी पोलिसांना त्यांच्या अधिकाराचा वापर करावा लागला दरम्यान कार्यक्रमामध्ये नियोजनाचा अभाव पाहण्यास मिळाला पत्रकार कक्षामध्ये पत्रकार सोडून इतर व्यक्तींचा हस्तक्षेप झाला.
- गौतमी पाटील ने तिच्या घायाळ करणाऱ्या लावणीच्या आदाने अक्षरशः महाराष्ट्राला वेड लावले आहे या कार्यक्रमात तरुणवर्गाच्या तोंडी एकच वाक्य ऐकण्यास मिळाले सबसे कातिल गौतमी पाटील.
लहुजी समाज सेवा मंडळाने सामाजिक सेवेच्या शुद्ध हेतूने आयोजित केलेल्या कार्यक्रमास हुल्लडबाजांमुळे काहीसे गालबोट लागल्याचे चित्र यावेळी दिसले. सध्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाची क्रेझ महाराष्ट्रभर असल्याने मोठा तरुणवर्ग गौतमीचा चाहता झाला आहे त्यामुळे काही चाहत्यांचा अतिजोश यावेळी अनावर झाल्याचे चित्र श्रीगोंदयात दिसले. त्यामुळे भविष्यात असे कार्यक्रम करायचे झाल्यास काटेकोर नियोजनाची आवश्यकता लागणार हे मात्र नक्की.
लोकक्रांती वृत्तांकन