टीम लोकक्रांती
खांडगाव, श्रीगोंदा | दि.४ मे २०२३ :
गुरुवार दि. ४ मे रोजी सायंकाळी ५ : ५० मि. नगर च्या दिशेने येणाऱ्या स्प्लेंडर (एम एच १६ए क्यू ७३०१ )आणि श्रीगोंदा कडून भरधाव वेगाने आलेल्या स्विफ्ट गाडीचा ( एम एच १२ पी एच ७६३९ ) अपघात खांडगाव मगर वस्ती जवळ झाला. अपघातात स्प्लेंडर च्या पाठीमागे बसलेले पिसोरा खांड येथील रहिवासी बन्सी सखाराम पांडुळे यांचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले असून सुखा लक्ष्मण पांडुळे यांना गंभीर दुखापत झाली असून दोन्ही हि अहमदनगर पंडित हॉस्पिटल येथे उपचार घेत आहेत अशी माहिती त्यांच्या नातेवाईक यांनी दिली.
या बाबतीत सविस्तर वृत्त असे की, गेल्या तीन महिन्यांपासून श्रीगोंदा – मांडवगण राज्य क्रमांक ६० दत्त मंदिर खांडगाव ते महाडूळवाडी या फेज चे रस्ता दुरुस्ती करण्याचे काम संबंधित ठेकेदाराला मिळाले असून सब कॉन्टॅक्टर म्हणून अभय एस मुथा हे काम करत आहे. हा रोड दोन्ही बाजूच्या साईड पट्टी काम पूर्ण करुन एका बाजूच्या साईड पट्टी वर खडी चे ढिगारे असल्यामुळे वाहन चालकाला जीव मुठीत घालून गाडी चालवावी लागते तसेच काही खडी रस्त्यावरती आलेली असल्या मुळे बाईक स्वार घसरुन अपघात होतात.
याच्या अगोदर ही बऱ्याच वेळा त्या ठिकाणी मोटरसायकल घसरून अपघात झाले आहेत.गेल्या तीन महिन्यापासून सदर रोडवर गाडी चालवणे जीवावर भेतू शकते ही परिस्थिती असताना देखील संबंधित ठेकेदार व पीडब्ल्यूडी विभागाचे कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता, तसेच कनिष्ठ अभियंता यांनी या कामाकडे जाणून बुजून दुर्लक्ष केल्या मुळे अपघाताला सामोरे जावे लागते ही या रोडची परिस्थिती आहे अशी माहिती राम घोडके यांनी दिली.
गेल्या आठवड्यात याच रोडचे काम लवकरात लवकर पुर्ण व्हावा अशी मागणी काही माध्यमाने केली होती परंतु त्याकडे पीडब्ल्यूडी अधिकारी दुर्लक्ष करत आहे आज जो अपघात होत आहेत त्याला सर्वस्वी जबाबदारी म्हणून पीडब्ल्यूडी अधिकारी व कंत्राटदार यांनी घ्यावी अशी नागरिकांमध्ये दबक्या आवाजात चर्चा होती.
चौकट –
रोड कंत्राटदार व पीडब्ल्यूडी कार्यकारी अभियंता यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची ग्रामस्थांकडून मागणी होत आहे तसेच रोड चे काम लवकरात लवकर सुरु केले नाही तर तीव्र आंदोलन छेडले जाईल व उपोषण केले जाईल – राम घोडके उपसरपंच
आजचा अपघातात रोड अरुंद असल्यामुळें गाडी खडी वरुन घसरून समोरच्या भरधाव वेगाने आलेल्या स्विफ्ट खाली गेली. स्विफ्ट च्या चालकाने गाडी कंट्रोल करण्याचे प्रसंगावधान दाखवून देखील रस्त्याच्या बाजूला खडीचे ढिगारे असल्यामुळे अपघात घडल्याचे घटनास्थळी दिसून आले.
पोलिस कॉन्स्टेबल प्रकाश दंदाडे यांनी घटनेची पाहणी करुन पुढील तपास श्रीगोंदा पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे अशी माहिती समजली. घटनास्थळी पिसोरा खांड सरपंच विकास इंगळे व पिसोरा तील पंचवीस ते तीस ग्रामस्थ उपस्थित होते. “अपघात झालेल्या घटना स्थळी खांडगाव – वडघुल गाव चे उपसरपंच राम घोडके यांनी भेट दिली व या संदर्भात पीडब्ल्यूडी अधिकारी व कंत्राटदार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी पोलीस प्रशासन कडे केली. या रोड चे काम लवकरात लवकर सुरु केले नाही तर खांडगाव, वडघुल, पिंसोरेखांड या गावचे ग्रामस्थ उपोषण करतील असे उपसरपंच राम घोडके यांनी सांगितले.
लोकक्रांती वृत्तांकन