टीम लोकक्रांती
श्रीगोंदा | दि.५ मे २०२३ :
कुकडी कारखाना एमडी मरकड साहेब यांना भेटण्यासाठी गेलो असता साहेब त्यांच्या दालनात दिसून आले नाही त्यांना चार-पाच वेळेस फोन केला फोन त्यांचा लागत नव्हता त्यामुळे ना इलाज असतो हार घालण्याचे आंदोलन करावे लागले कारखान्याने सिक्युरिटी गार्ड बळावर आम्हाला दालनामध्ये प्रवेश करून दिला नसल्याने आम्ही दालनाच्या बाहेरून एमडी साहेबांच्या त्यांना हार घातला व त्यांना सद्बुद्धी देवो अशा शुभेच्छा दिल्या येत्या काळात कुकडी सहकारी साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे देणे वेळेत न दिल्यास साखर आयुक्तांना लवकरच निवेदन करणार आहे असे संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष नाना शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले
संभाजी ब्रिगेड शेतकरी आघाडी प्रदेश उपाध्यक्ष संग्राम देशमुख यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले आहे संग्राम देशमुख यांनी वेळोवेळी कारखान्याच्या ऑफिसमध्ये जाऊन वेळोवेळी शेतकऱ्यांचे बिल वेळेत द्या असे खडसावलेले असताना देखील कारखाना कुठलीच दखल घेत नाही
कुकडी सहकारी साखर कारखाना लिमिटेड या कारखान्यांने असंख्य शेतकऱ्यांचे उसाचे बिले वेळेत न दिल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान शेतकऱ्यांचे पीक कर्ज व इतर देणे वेळेवर न गेल्याने आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी गेली दोन महिने झाले कारखान्यात मध्ये येतात हेलपाटे मारून जातात अक्षरशः मेटाकुटीला आलेल्या आहे
एक शेतकरी अक्षरशा ऑफिसच्या दारापुढे झोपून होता त्याला वीस तारखेला बिल देतो अशा आश्वासन दिले लोळी घेतलेल्या शेतकरी उठून बसला प्रत्यक्षदर्शी आज छत्रपती संभाजीनगर गंगापूर तालुक्यातील शेतकरी वैतागलेला आहे अहमदनगर जिल्ह्यातील बऱ्याच तालुक्यातील कुकडी कारखान्याने गाळप केलेले आहेत यंदा पाऊस जास्त झाल्यामुळे उसाचे उत्पादन कमी टनेज मिळाले आहे तसेच शेतकरी अडचणीत असताना उसाचे बिले वेळेत दिले असते तर शेतकऱ्याचा फायदा झाला असता
सेवा सोसायटीमध्ये मार्च महिन्याच्या आत पीक कर्ज भरल्यास केंद्र व राज्य सरकार संपूर्ण व्याज माफ करणार आहे बऱ्याच शेतकऱ्यांचा कर्जाचा बोजा मोठा आहे कमीत कमी वेळेत पैसे भरले तर शेतकऱ्याचं व्याज तरी माफ होईल आज परिस्थिती अशी झालेली आहे कारखाना वेळेत पैसे देणार तेव्हा सोसायटीचे कर्ज फिटेल व्याजाची रक्कम वाढत चालली शेतकरी अक्षरशः मेटाकोटीला आलेला आहे
फेसबुक लाईव्ह असताना कर्मचाऱ्यांनी कॅमेरा हिसकवला आशा प्रकारचा अनुभव तिथे आला संभाजी ब्रिगेड येत्या काळात तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
लोकक्रांती वृत्तांकन