टीम लोकक्रांती
शेडगाव, श्रीगोंदा | दि.११ मे २०२३ :
श्रीगोंदा तालुक्यातील शेडगाव या ठिकाणी उपसरपंच पदाचा ठरलेला कार्यकाल संपल्यामुळे त्या ठिकाणी उपसरपंच पदाची जागा रिक्त झाल्याने त्या जागेव फेरनिवड करण्यात आली या फेर निवडणुकीमध्ये पार्वतीबाई बापू गवळी यांची उपसरपंच म्हणून एकमताने निवड करण्यात आली. उपसरपंच निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी प्रशांत देवतरसे यांनी काम पाहिले.
शेडगाव ग्रामपंचायत च्या निवडणुका पार पडल्यानंतर सरपंच पदी संध्या शेंडे व उपसरपंच पदी सोनाली भदे यांची निवड करण्यात आली होती परंतु निवड झाल्यानंतर उपसरपंच पदाचा कार्यकाल एक वर्ष ठरविण्यात आला होता त्यानुसार उपसरपंच पदाचा कार्यकार संपल्यानंतर आज उपसरपंच पदासाठी फेर निवड करण्यात आली असून यामध्ये पार्वतीबाई बापू गवळी यांची उपसरपंच पदी निवड करण्यात आली.
निवड प्रक्रिया पार पडल्यानंतर नूतन उपसरपंच यांच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत होता. उपसरपंच निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी प्रशांत देवतरसे यांनी काम पाहिले त्यामध्ये गावातील सरपंच परिषदेचे अध्यक्ष विजयराव शेंडे सरपंच संध्या शेंडे, सोसायटी चेअरमन लक्ष्मणराव रसाळ, श्रीदत्त विकास सोसायटीचे चेअरमन राजाराम रसाळ, तंटामुक्ती अध्यक्ष भीमराव बेलेकर,शांताराम गोरे,किसन बेलेकर,धनराज भोपळे,लिंबाजी रसाळ, कांतीलाल गवळी यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी वृंद यांनी पार्वतीबाई गवळी यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
लोकक्रांती वृत्तांकन