सीबीएसई २०२३ मध्ये झालेल्या परीक्षेमध्ये शिवाजीराव नागवडे डॅफोडील्स स्कूल तालुक्यामध्ये प्रथम!

टीम लोकक्रांती
लिंपणगाव, श्रीगोंदा | दि.१२ मे २०२३ :
सी बी एस ई बोर्ड अंतर्गत इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. या परीक्षेमध्ये दरवर्षीप्रमाणे शिवाजीराव नागवडे डॅफोडील्स स्कूलने उज्वल निकालाची परंपरा कायम राखली. या निकालामध्ये समृद्धी मधुकर पांडुळे या विद्यार्थिनीने ९५.६०% गुण मिळवून तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळवला, तसेच सानिका संदीप कदम व ओमकार नंदलाल घालमे या विद्यार्थ्यांनी ९३.६०% गुण मिळवून दुसरा येण्याचा मान मिळवला, प्रणव रमेश थोरात या विद्यार्थ्याने ९२.८०%गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला. तसेच प्रथम श्रेणी मध्ये विद्यालयाचे ८०% टक्के विद्यार्थी आलेले आहेत.या निकालासाठी संस्थेचे निरीक्षक, प्राचार्य,सर्व शिक्षक यांनी वेळोवेळी अतिशय चांगले मार्गदर्शन व परिश्रम घेतले.

या निकाला बद्दल संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र शिवाजीराव नागवडे, संस्थेच्या विश्वस्त सौ अनुराधा नागवडे यांनी विद्यार्थ्यांचे त्यांच्या पालकांचे व शाळेच्या सर्व शिक्षकांचे खूप खूप कौतुक केले व विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या.

ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना दर्जेदार व उच्च प्रतीचे शिक्षण मिळावे यासाठी श्रीगोंदा मध्ये पहिले सीबीएसई स्कूल आपण चालू केले व या अंतर्गत गुणवंत विद्यार्थी घडवण्यासाठी सदैव आपण तत्पर आहोत असे मत राजेंद्र नागवडे यांनी व्यक्त केले.

या निकालामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले असून याचा परिणाम यावर्षीच्या दहावीच्या विद्यार्थ्यांवरती चांगला दिसून येईल असे मनोगत संस्थेचे निरीक्षक गोलांडे सर यांनी व्यक्त केला.
लोकक्रांती वृत्तांकन

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
overcast clouds
23.6 ° C
23.6 °
23.6 °
84 %
7.7kmh
100 %
Tue
24 °
Wed
26 °
Thu
28 °
Fri
29 °
Sat
29 °
error: Content is protected !!