टीम लोकक्रांती
देवदैठण, श्रीगोंदा | दि.१५ मे २०२३ :
सगळे नेते एका बाजूला असताना तालुक्यातील जनतेने झालेल्या निवडणुकीचा कौल दिल्याने ताकद वाढली आहे. माझे कार्यकर्ते सर्व सामान्य व तळागाळात काम करणारे आहेत. यामुळे कार्यकर्ते हीच माझी ताकद आहे. असे मत कुकडीचे अध्यक्ष माजी आमदार राहुल जगताप यांनी व्यक्त केले.स्व.कुंडलिकराव जगताप यांचे जयंती निमिताने आर.जे.प्रतिष्ठान श्रीगोंदा-नगर यांचे वतीने पिंप्री कोलंदर येथील शिवालय मंगल कार्यलयात आरोग्य शिबीर रविवारी घेण्यात आले.या वेळी जगताप बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ओम गुरुदेव महिला पतसंस्थेच्या अध्यक्ष डॉ.प्रणोती जगताप तसेच माजी अध्यक्षा अनुराधा जगताप उपस्थित होत्या.या वेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हरिदास शिर्के,खरेदीविक्री संघाचे अध्यक्ष सुभाष काळाने,संदिप सोनलकर,माजी प.स.सदस्य कल्याणी लोखंडे,सरपंच सोनाली गणेश बोबडे,प्रतीक्षा मेंगवडे,मीना सकट यांनी मनोगत व्यक्त केले.
पुढे बोलताना जगताप म्हणले ग्रामीण भागातील अनेक शेतकरी,महिला नागरिक हे आजार अंगावर काढतात.तसेच मोठ्या हॉस्पिटल मध्ये उपचारास येणारा खर्च हा न परवडणारा आहे. यामुळे गावोगाव आरोग्य शिबिरे ही काळाची गरज आहे.
या वेळी डॉ. प्रणोती जगताप यांनी तात्यांच्या आठवणीना उजाळा देताना अतिशय कमी दिवस तात्यांची साथ मला मिळाली.तात्यांच्या आजारपणातील आठवणी सांगताना कुकडी परिवाराच्या आधारस्तंभ अनुराधा(अक्का) जगताप यांना अश्रू अनावर झाले.
रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे.एखाद्याला जीवदान देण्यासाठी अनेकांनी रक्तदान करावे .महिलांनी आजार लपवू नयेत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.या पुढील काळात अशा शिबिराचे आयोजन केले जाईल.प्रचंड उन्हाळा असल्याने पाणी जास्त पिण्याचे आवाहन डॉ.जगताप यांनी केले.
एच.व्हि देसाई नेत्र तपासणी पुणे य हॉस्पिटल मार्फत करण्यात आली.तसेच येळपणे गटात झालेल्या या शिबिरास हजारोंच्या संखेने नागरिक उपस्थित होते.एकूण ११३० रुग्णांची तपासणी झाली .यामध्ये ९२ मोतीबिंदू ,१३ तीराळे पणा,आणि ९५ रक्त दात्यानी रक्तदान केले. नेत्र तपासणी चष्मे तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रिया आर.जे.प्रतिष्ठान यांचे वतीने मोफत करण्यात येणार आहे.
रक्तदान शिबिरास तरुणांनी मोठा प्रतिसाद दिला.आरोग्य शिबिराचे आयोजक हनुमान वि.का.से.संस्थेचे अध्यक्ष किशोर घेगडे,बाबुशेठ राक्षे,शारद मांडगे,विलास घेगडे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी कुकडीचे सर्व आजी माजी संचालक,उपाअध्यक्ष तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अतुल लोखंडे,अजित जामदार,भास्कर वागस्कर,मोहन दळवी,बापू कातोरे,सोमनाथ वाखारे आदी उपस्थित होते.कुकडीचे संचालक अशोक वाखारे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.सूत्रसंचालन रावसाहेब चक्रे यांनी केले तर सोमनाथ पवार यांनी आभार मानले.
लोकक्रांती वृत्तांकन