टीम लोकक्रांती
मांडवगण, श्रीगोंदा | दि.१६ मे २०२३ :
मंगळवार दि.१६ मे रोजी मांडवगण येथे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साध्या पद्धतीने डीजे न लावता साजरी झाली त्यानिमित्त नेत्र तपासणी शिबिर आयोजित केले होते गावातील वाड्या वस्तीवरील लोकांनी मोठा प्रतिसाद दिला.यावेळी कार्यक्रमास आलेल्या मान्यवरांना छत्रपती संभाजी महाराजांचे पुस्तक भेट देण्यात आले.
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून नेत्र तपासणी शिबिर आयोजित केले होते प्रथम प्रतिमापूजन करून रुग्णांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आलेल्या मान्यवरांना छत्रपती संभाजी महाराज यांचे पुस्तक भेट देण्यात आले पुस्तकांद्वारे वैचारिक देवाणघेवाण करत कार्यक्रम संपन्न झाला.
आलेल्या मान्यवरांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा व्यक्त केल्या कार्यक्रमाला तालुका कृषी अधिकारी सुपेकर साहेब यांनीही भेट दिली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मांडवगण सेवा सोसायटीचे चेअरमन झुंबरराव बोरुडे हे होते.
या कार्यक्रमास व्हाय चेअरमन विनोद देशमुख, माजी सरपंच सुरेश लांडगे, पत्रकार राजेंद्र घोडके, सामाजिक कार्यकर्ते गोवर्धन कार्ले, संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष नाना शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच या कार्यक्रमाचे आयोजक संग्राम देशमुख संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष शेतकरी आघाडी यांनी आयोजन केले होते या जयंतीनिमित्त गावातील व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकक्रांती वृत्तांकन