टीम लोकक्रांती
लिंपणगाव, श्रीगोंदा | दि.१८ मे २०२३ :
श्रीगोंदा विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या चेअरमन व व्हा चेअरमनपदासाठी दि. १६ मे २०२३ रोजी निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक अभिमान थोरात यांचे अध्यक्षते खाली सहाय्यक निबंधक कार्यालयात बैठक संपन्न झाली चेअरमनपदा साठी अशोक बाजीराव आळेकर यांच्या नावाची सुचना बापुराव भिकाजी सिदनकर यांनी केली तर सुभाष विठ्ठल बोरूडे यांनी अनुमोदन दिले.व्हा चेअरमनपदासाठी सखाराम दशरथ औटी यांचे नावाची सुचना पोपट दतू कोथिंबीरे यांनी केली तर अनुमोदन हनुमंत धोंडीबा उदमले यांनी दिले दुसरा कोणताही अर्ज न आल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले.
याप्रसंगी संस्थेचे संचालक भिमराव आनंदकर, सुनील बोरूडे, मोहनराव डांगरे,अनिल नन्नवरे, राजु गोरे,सौ ज्योती खेतमाळीस, मंदाकिनी वडवकर उपस्थित होते. तसेच जेष्ठ नेते एकनाथराव आळेकर, भाऊसाहेब खेतमाळीस, अॅड. अशोकराव रोडे, विजय कापसे, पोपटराव बोरूडे, शंकर हिरडे, अरूण खेतमाळीस, सुर्यकांत वडवकर आदी मान्यवर उपस्थित होते.
निवडणूक कामी संस्थेचे सचिव राजू सिदनकर, मॅनेजर भाऊसाहेब सिदनकर, लक्ष्मण बनसुडे, उमेश सुर्यवंशी उपस्थित होते. नवनिर्वाचित अध्यक्ष- उपाध्यक्ष यांचे सहकार महर्षी नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, उपाध्यक्ष बाबासाहेब भोस, जिल्हा बँकेचे संचालिका अनुराधा नागवडे, इंदिरा नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष एकनाथराव आळेकर, उपाध्यक्ष महादेव कदम, सुदाम दांडेकर आदींनी अभिनंदन केले आहे.
लोकक्रांती वृत्तांकन