टीम लोकक्रांती
श्रीगोंदा दि.२४ मे २०२३ :
सोमवार दि.२२ मे रोजी श्रीगोंदा नगरपरिषद घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला मोठी आग लागून हजारो टन कचरा जळून खाक झाला श्रीगोंदा नगरपरिषद घनकचरा व्यवस्थापन नीट नाटके होत नसल्याने परिसरात नागरी समस्या निर्माण झाल्या आहेत सोमवार २२ मे रोजी ठीक सायंकाळी सहा वाजता प्रकल्पाला आग लागली अग्निशमन दल सज्ज झाले पाण्याचे अंतर व कचऱ्याचे ढीग पेटलेले याचे अंतर ६ किलोमीटर असल्याने कचरा भिजवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली.
श्रीगोंदा नगर परिषदेमध्ये वर्षाला साधारण तीन कोटी रुपये घनकचरा व्यवस्थापन यासाठी खर्च केला जातो रोजचा दहा टन कचरा संकलित होतो साधारण दोन वर्षाचा कचरा असल्यामुळे हजारो टन कचरा जळून खाक झालेला आहे
श्रीगोंदा नगरपरिषद ठेकेदारामार्फत हे सर्व करून घेत असते. ठेकेदाराचे काम शहरातील प्रत्येक घरातील कचरा गोळा करून त्याचे ओला सुखा वेगळा करून कचरा डेपो या ठिकाणी नेला जातो त्या ठिकाणी वर्गीकरण करून प्लास्टिक वेगळे केले जाते असे काही या ठिकाणी दिसून येत नाही मूळ ठेकेदार या ठिकाणी कधीच येत नाहीत
संभाजी ब्रिगेड च्या टीमने एक महिन्यापूर्वी मुख्याधिकारी साहेबांना भेट दिली त्यावेळेस चर्चा झाली त्यामध्ये साहेब म्हणले येते आठ दिवसात आम्ही प्रकल्प चालू करू साहेबांना आम्ही चर्चा करत असताना तुम्ही प्रकल्प चालू न केल्यास आम्ही थोड्या दिवसात घनकचरा व्यवस्थापन डेपोला टाळे ठोकण्याचे तोंडी इशारा दिला होता आमच्या इशाऱ्याला मुख्याधिकारी साहेबांनी केराची टोपली दाखवली आहे
मुळात या प्रकल्पाला २०१७ साली मंजुरी मिळाली आज २०२३ उजाडले म्हणजे सहा वर्ष झाले एकही त्या प्रकल्पातली मोटर फिरली नाही ही खूप मोठी दुर्दैवी गोष्ट आहे पालिका प्रशासनाचे घनकचरा डेपोकडे अक्षरशा दुर्लक्ष आहे परिसरातील नागरिकांना प्लास्टिकचा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे तसेच कचरा पेटल्यानंतर परिसरामध्ये श्वसनाचे आजार मोठ्या प्रमाणात वाढत आहेत तसेच परिसरामध्ये कुत्र्यांचे प्रमाण वाढले आहे या परिसरामध्ये उग्र असा वास कायमस्वरूपी चालू असतो
तसेच शहरामध्ये कायमस्वरूपी प्लास्टिक बंदी करावी काही दिवसापूर्वी जिल्हाधिकारी साहेबांनी या प्रकल्पाला भेट दिली या प्रकल्पाची कंपाउंड भिंत उंच करून देऊ असे आश्वासन जिल्हाधिकारी साहेबांनी दिले अक्षरशा त्या आश्वासनाला केराची टोपली मिळाली आहे येत्या काळात नगर विकास मंत्री यांना पत्रव्यवहार करणार आहोत तसेच श्रीगोंदा नगर परिषदेने लवकरात लवकर हा प्रकल्प चालू न केल्यास संभाजी ब्रिगेड कचरा डेपो टाळे ठोको आंदोलन छेडणार आहे.
लोकक्रांती वृत्तांकन