नगरपालिका कचरा डेपोमुळे आसपासच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात

घनकचरा प्रकल्प सुरू नझाल्यास संभाजी ब्रिगेड व स्थानिक नागरिक कचरा डेपो ला टाळे ठोकू आंदोलन करणार!

टीम लोकक्रांती
श्रीगोंदा | दि.३० मे २०२३ :
श्रीगोंदा नगर परिषदेने घनकचरा प्रकल्प लवकर सुरू करावा तसेच श्रीगोंदा शहरात प्लास्टिक बंदी करावी या मागणीसाठी निवासी तहसीलदार यांना संभाजी ब्रिगेड चे पत्र श्रीगोंदा नगरपरिषद घनकचरा प्रकल्प गट क्रमांक १६२९ श्रीगोंदा येथे बऱ्याच दिवसापासून उभारलेला आहे महाराष्ट्र शासनाने श्रीगोंदा नगर परिषदेसाठी घनकचरा प्रकल्पासाठी कोट्यवधी रुपयांच्या मशनरी उपलब्ध करून दिलेले आहेत २०१७ मध्ये हा प्रकल्प मंजूर झाला आज २०२३ उजाडले आहे तरीपण एकही मशीन या ठिकाणी चालू अवस्थेत नाही.

नगर परिषदेची उदासीनता यातून लक्षात येत आहे हा प्रकल्प मागेच चालू झाला असता तर लाखो टन कचरा जळून खाक झाला नसता या परिसरामध्ये प्रदूषण झाले नसते हा प्रकल्प लवकरात लवकर चालू व्हावा असे निवेदन तहसीलदार साहेबांना दिलेले आहे दि. ५ जून २०२३ रोजी सकाळी ११ वाजता संभाजी ब्रिगेड व स्थानिक नागरिक कचरा डेपो ला टाळे ठोकू आंदोलन करणार आहे हे आंदोलन श्रीगोंदा नगर परिषदेवर असणार आहे असे निवेदन देण्यात आलेले आहे निवेदन देताना संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष नाना शिंदे उपाध्यक्ष सागर हिरडे हे उपस्थित होते.
लोकक्रांती वृत्तांकन

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
light rain
25.5 ° C
25.5 °
25.5 °
76 %
6.1kmh
100 %
Sat
24 °
Sun
22 °
Mon
23 °
Tue
27 °
Wed
28 °
error: Content is protected !!