टीम लोकक्रांती
श्रीगोंदा | दि.३१ मे २०२३ :
बुधवार दि.३१ मे रोजी छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारकाचे रखडलेले काम लवकर सुरू करण्यात यावे यासाठी शंभू प्रेमी व संभाजी ब्रिगेडने श्रीगोंदा पेडगाव रोड, छत्रपती संभाजी महाराज चौकात रखरखत्या उन्हात बसून अर्धनग्न आंदोलन केले.
गेल्या एक महिन्यापूर्वी या स्मारकाचे भूमिपूजन झाले एक महिना उलटून गेला तरी स्मारकाच्या कामाला गती मिळेना म्हणून शंभू प्रेमींनी अर्ध नग्न होऊन भर उन्हात बसून आपला निषेध व्यक्त केला. श्रीगोंदा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी साहेब तसेच मनोहर पोटे बापू गोरे,प्रशांत गोरे,सुनील वाळके, इंजिनिअर पटवा, शहाजी खेतमाळीस , आरिफ मालजपते घटनास्थळी दाखल झाले व आंदोलन कर्त्याना लवकरात लवकर काम सुरू करण्याचे आश्वासन देत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली.
नगरपालिकेचे मुख्यधिकारी यावेळी म्हणाले की थोडी तांत्रिक अडचण असल्यामुळे हायमॅक्स हटवण्याचे कामास उशिर झाला व त्यामुळे हा उशीर झालेला आहे. इंजिनिअर पटवा साहेब हे ड्रॉईंग देण्यासाठी टाळाटाळ करत होते असा आंदोलनकर्त्यांच प्रमुख आरोप होता.उपस्थित सर्वांनी आम्ही तात्काळ ड्रॉईंग तयार करून काम लगेच सुरू करू असे त्यांनी सांगितले.
जगातील पहिला अश्वारूढ पुतळा श्रीगोंदा मध्ये उभारण्यात येणार आहे ही गर्वाची बाब आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचा आदर्श घेऊन पुढे जाता येणार आहे. यावेळेस हे आंदोलन अरविंद कापसे यांच्या नेतृत्वाखाली पार पडले या आंदोलनामधे राष्ट्रवादीचे शाम जरे ,कॉन्ट्रॅटर दिलीपराव लबडे, संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष नाना शिंदे व इतर शंभू प्रेमींनी यामध्ये सहभाग घेतला होता.
दिलेले आश्वासन जर पाळले नाही तर याही पेक्षा तीव्र आंदोलन करू असे आंदोलनकर्त्यांनी यावेळे अधिकारी व पदाधिकारी यांना ठणकावून सांगितले आहे.
लोकक्रांती वृत्तांकन