टीम लोकक्रांती | दि. ६ जून २०२३ :
अचूकपणे हवामानाचा अंदाज वर्तवणारे पंजाब डख यांचा नवीन मान्सून अंदाज आला! 5 जून ते 20 जून राज्यात कसं राहणार हवामान? पाऊस कसा पडणार? पहा New Monsoon Update Panjab Dakh : महाराष्ट्रात दि.४ जून पासून पूर्व मोसमी पावसाला सुरुवात झाली. राज्यातील अहमदनगर, पुणे, वाशिम, जळगाव, धुळे, नासिक, छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील अनेक जिल्ह्यात मान्सूनपूर्व पाऊस झाला आहे. काही भागात गारपीट देखील झाली आहे तर काही ठिकाणी वादळाचा तडाखा बसला आहे परंतु या पूर्व मोसमी पावसामुळे राज्यातील जनतेला उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.
मात्र असे असले तरी राज्यात अद्याप मान्सूनचे आगमन झालेले नाही. विशेष बाब म्हणजे भारतीय हवामान विभागाने मान्सून अजून केरळात दाखल झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे. खरंतर आय एम डी ने मान्सूनचे यंदा केरळात 4 जूनला आगमन होणार असा अंदाज गेल्या पंधरा दिवसांपूर्वी वर्तवला होता.
मात्र हा अंदाज पुन्हा एकदा खोटा ठरला आहे. अद्याप केरळमध्ये मान्सून पोहोचला नसून पुढील तीन ते चार दिवसात केरळात मान्सून येईल असा अंदाज भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून आता समोर आला आहे. तसेच महाराष्ट्रात देखील मान्सूनचे आगमन उशिराने होईल असं हवामान विभागाने स्पष्ट केलं आहे.
दरवर्षी महाराष्ट्रातील तळ कोकणात मान्सून सात जूनला येत असतो मात्र यंदा मान्सून 15 जून पर्यंत मुंबईसह महाराष्ट्रात पोहचेल असा अंदाज IMD ने वर्तवला आहे. हवामान तज्ञ पंजाब डख यांनी मात्र यंदा मान्सून संदर्भात आपला वेगळाच अंदाज सार्वजनिक केला आहे.
पंजाब डख यांनी वर्तवलेल्या आपल्या नवीन मान्सून अंदाजानुसार, यंदा राज्यात मान्सूनचे आगमन 8 जूनलाच म्हणजेच वेळेतच होणार आहे. तसेच त्यांनी 4 जून पासून अर्थातच कालपासून मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात होणार असल्याचा अंदाज देखील व्यक्त केला होता. या अंदाजानुसार आता राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात पूर्व मौसमी पावसाला सुरवात देखील झाली आहे.
यामुळे आता पंजाब डख यांनी संपूर्ण जून महिन्यात पाऊसमान कसा राहणार? या संदर्भात काय अंदाज व्यक्त केला आहे याबाबत जाणून घेण्याची उत्सुकता शेतकऱ्यांसहित सामान्य जनतेला आहे. अशातच डख यांनी पाच जून ते 20 जून दरम्यान कस हवामान राहणार याबाबत एक मोठी माहिती दिली आहे. डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात सात जून पर्यंत पूर्व मोसमी पाऊस पडणार आहे.
यानंतर राज्यात मोसमी पावसाला अर्थातच मान्सूनला सुरुवात होणार आहे. आठ जून पासून ते 12 जून पर्यंत राज्यात मुसळधार पाऊस पडणार आणि 14 जून ते 20 जून दरम्यान पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज पंजाब डख यांनी व्यक्त केला आहे. विशेष बाब म्हणजे राज्यात यंदा जून महिन्यातच शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पेरण्या पूर्ण होतील असं भाकीतही त्यांनी बोलून दाखवलं आहे.
निश्चितच डख यांच्या अंदाजामुळे मान्सूनची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव स्पष्टपणे झळकत आहेत. जर डख यांचा हा अंदाज खरा ठरला आणि ८ जून पासून मोसमी पावसाला सुरुवात झाली तर शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून ही एक दिलासादायक बाब सिद्ध होणार आहे.
पंजाब डख हे नेहमीच अचूक हवामान अंदाज व्यक्त करत असतात अशातच त्यांचा हा मान्सून बाबतचा अंदाज जर खरा ठरला तर शेतकरी राजा सुखावणारा हे मात्र निश्चित.