टीम लोकक्रांती | दि.६ जून २०२३ :
अहमदनगर : जिल्हा परिषद अहमदनगर मध्ये लॉटरी पद्धतीने वाटप करण्यात येणाऱ्या काम वाटपात गैरप्रकार झाल्याचा महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ संघटनेने आरोप केला आहे. दि. २२ मे २०२३ रोजी लॉटरी पद्धतीने काम वाटपाची यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. या यादीमध्ये संपूर्ण कामांची संख्या २२७ होती. त्यामध्ये सु.बे.अ साठी १८८ तर इलेक्ट्रिकल सु.बे.अ साठी १६ तर म.स.सं साठी २३ या पद्धतीने कामवाटप यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. परंतु सु.बे.अ च्या यादी मधून २५ तर म.स.सं च्या यादीतून ०४ कामे बेकायदेशीर पद्धतीने खूप मोठ्या प्रमाणात पैशाचा आणि आर्थिक वापर करून मर्जीतील ठेकेदारांना ग्रामपंचायतीच्या नावे २९ कामांचा घोडेबाजार करण्यात आलेला आहे असा आरोप या संघटनेने जिल्हा परिषद अहमदनगर मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदनाद्वारे केलेला आहे.
या प्रकरणांमध्ये संबंधित अधिकाऱ्यांकडून नियमांची पायमल्ली करण्यात आलेली आहे.त्यामुळे कंत्राटदारांवर खूप मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे .
संबंधित अधिकाऱ्यांची योग्य ती लवकरात लवकर चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करावी आणि ऑनलाइन लॉटरी पद्धतीने कामवाटप प्रणाली बंद करण्यात यावी ही विनंती अन्यथा आपल्या कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने उपोषण करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ या संघटनेने निवेदनाद्वारे दिला.
चौकट :
लॉटरीच्या कामांमध्ये घोळ करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर लवकरात लवकर योग्य ती कारवाई करण्यात यावी.
समिर शेख
जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ
चौकट :
ठराविक अधिकारी शासनाचे नियम धाब्यावर बसून मर्जीतील ठेकेदारांना गुलाम बनवण्याचे काम करत आहेत.
गणेश श्रीराम
श्रीगोंदा तालुका अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ