पंजाब डख यांच्या अंदाजानुसार यावेळी मान्सून केरळ मधून नाही येणार..! पहा काय आहे डख यांचा अंदाज

टीम लोकक्रांती | दि.८ जून २०२३ :
पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज दरवेळी शेतकऱ्यांसाठी फायद्याचा ठरला आहे आत्ताची शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे मान्सून २०२३ संदर्भात. परभणीचे हवामान तज्ञ पंजाब डख यांनी मान्सून संदर्भात एक महत्त्वाची अपडेट नुकतीच सार्वजनिक केली आहे. तसेच यावेळी पंजाब डख यांनी एक मोठा दावा देखील केला आहे. नेमका काय दावा केला ते पाहुयात.

यंदा मान्सून पूर्वेकडून महाराष्ट्रात दाखल होणार – पंजाब डख

पंजाब डख यांनी असा दावा केला आहे की, यंदा मान्सूनचे आगमन केरळ मधून होणार नाही. तर यंदा मान्सून हा पूर्वेकडून दाखल होणार आहे. म्हणजेच तेलंगाना कडून मान्सून येणार आहे. यामुळे यंदा देखील २०१९ सारखीच परिस्थिती राहणार असून महाराष्ट्रात समाधानकारक मान्सून राहणार आहे.

पंजाब डख यांच्या अंदाजानुसार कोणत्या जिल्ह्यांत जोरदार पाऊस पडनार

पूर्वेकडील भागातून पाऊस येणार असं पंजाब डख सांगतात, जर मान्सूनचे पूर्वेकडून आगमन झाले तर महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात जोरदार स्वरूपाचा पाऊस होत असतो. यंदा देखील पूर्वेकडून मान्सूनचे आगमन होणार असून यामुळे यावर्षी विदर्भ, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, परभणी, नांदेड, जालना, छत्रपती संभाजी नगर, बीड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली, सातारा, या जिल्ह्यात जोरदार पाऊस होणार आहे. तसेच यंदा जून महिन्यात याआधी कधीही पडलेला नसेल असा पाऊस पडण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. जून मध्ये जर पाऊस पडला तर पिकांसाठी नक्कीच फायद्याची गोष्ट ठरणार आहे.

भारतीय हवामान विभाग व पंजाब डख यांचे मान्सून येण्याचे अंदाज वेगवेगळे

डख यांनी वर्तवलेल्या सुधारित मान्सून अंदाजानुसार, यंदा मान्सूनचे राज्यात आठ जून दरम्यान आगमन होणार आहे. निश्चितच डख यांचा हा अंदाज जर खरा ठरला तर राज्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून ही एक महत्त्वाची आणि अतिशय आनंदाची बातमी राहणार आहे. परंतु भारतीय हवामान विभागाने केरळमध्ये मान्सूनचे आगमन पुढील २४ ते ४८ तासात होणार असल्याचा अंदाज बांधला आहे. यानंतर तेथून साधारणता एका आठवड्यानंतर मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन होणार आहे. पंजाब डख यांनी मात्र या अंदाजाच्या अगदी उलट अंदाज वर्तवला आहे.

कधी आणि कसा पडणार पाऊस

पंजाब डख यांच्या अंदाजानुसार मान्सूनचे आठ तारखेला आगमन होणार आणि मान्सूनचा जोर १० ते १२ जून दरम्यान वाढणार असा त्यांचा अंदाज आहे. सोबतच विदर्भात मान्सूनचे आगमन ११ ते १२ जून या काळात होणार असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला असून १४ जून ते २० जून पर्यंत महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिल्ह्यात मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. या कालावधीत राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडेल आणि शेतकरी बांधवांच्या २८ जून पर्यंत पेरण्या आटोपल्या जातील असं भाकीत त्यांनी या सुधारित अंदाजामध्ये व्यक्त केल आहे. त्यामुळे ही बातमी शेतकऱ्यांसाठी नक्कीच दिलासा दायक ठरणार आहे असेच म्हणावे लागेल.

शेतकऱ्यांसाठी भारतीय हवामान विभागाचा अंदाज खरा ठरतो की पंजाब डख यांचा अंदाज खरा ठरतो काही झालं तरी शेतकरीराजा साठी एकच गोष्ट महत्वाची ती म्हणजे पावसाचे वेळेवर आगमन.

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
overcast clouds
23 ° C
23 °
23 °
86 %
6.7kmh
100 %
Wed
23 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
27 °
Sun
27 °
error: Content is protected !!