MBBS Education : नवीन डॉक्टर होणाऱ्या विध्यार्थ्यां साठी आनंदाची बातमी; पहा देशात कुठे आणि किती नवीन कॉलेजेस सुरू होणार..!

NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.

लोकक्रांती ऑनलाईन : आज शैक्षणिक क्षेत्रात खूप मोठी स्पर्धा सुरू आहे त्यामुळे प्रचंड मेहनत घेतली तरच आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करायचंय स्वप्न पूर्ण होते. असंख्य विद्यार्थी डॉक्टर होण्याचं स्वप्न MBBS Education लहानपणापासून पाहत असतात. डॉक्टर होण्यासाठी अनेकजण MBBS ची तयारी करत असतात. विद्यार्थ्यांच्या तुलनेत देशात मेडीकल कॉलेजची संख्या कमी आहे; परिणामी मेडीकलच्या जागा कमी असल्याने प्रचंड स्पर्धा निर्माण झालेली आहे. त्यामुळे मेडीकलच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे कॉलेज मिळत नाही. त्यामुळे केंद्र सरकारने आता मेडीकल कॉलेजांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. पाहुयात सरकारने किती मेडीकल कॉलेजेसना मंजूरी दिली आहे आणि किती MBBS Education कॉलेजेसना मिळाली मान्यता.

नवीन किती कॉलेज सुरु होणार व किती MBBS जागा वाढणार

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या निर्णया नुसार देशातील मेडीकल कॉलेजच्या जागा वाढणार आहेत. त्यामुळे एमबीबीएस बनण्यासाठी NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. देशात आता ५० नविन मेडीकल कॉलेज सुरु होणर आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने त्यासाठी मंजूरी दिली आहे. आता मेडीकलच्या MBBS Education जागांमध्ये वाढ होणार आहे. देशात आता एकूण मेडीकलच्या कॉलेजांची संख्या ७०२ झाली आहे. त्यामुळे एमबीबीएसच्या जागांची संख्या आता १,०७,६५८ इतकी झाली आहे.

पहा कोणत्या राज्यात किती कॉलेज होणार

भारतात ५० नवीन मेडिकल कॉलेजेसला परवानगी देण्यात आली आहे कोणत्या राज्यत किनी नवीन कॉलेज MBBS Education होणार हे पहा यातील तेलंगणात १३ मेडीकल कॉलेज, राजस्थानात आणि आंध्र प्रदेशात प्रत्येकी ५, महाराष्ट्रामध्ये ४, आसाम, कर्नाटक, तामिळनाडू आणि गुजरात राज्यात प्रत्येकी ३ मेडीकल कॉलेज, हरीयाणा, ओडीशा आणि जम्मू – कश्मीरमध्ये प्रत्येकी २, आणि मध्य प्रदेश आणि नागालँडमध्ये प्रत्येकी १ इतक्या मेडीकल कॉलेजचा समावेश आहे.

यासाठी घेण्यात आलेल्या NEET परीक्षेचा निकाल लवकरच

दरम्यान NEET परीक्षेचा निकाल लवकरच लागणार आहे मेडिकल कॉलेजला MBBS Education प्रवेश घेणाऱ्या विध्यार्थ्यांनी आता तयारीत रहावे आहे, उत्तर पत्रिका याआधीच जाहीर करण्यात आल्या आहेत. आता यानंतर लवकरच निकाल जाहीर होणं अपेक्षित आहे. त्यानंतर काऊन्सिलींग प्रक्रिया सुरू होणार आहे. नीट काऊन्सिलींगची माहीती अधिकृत वेबसाईटवर दिली जाते. विध्यार्थ्यांनी योग्य प्रकारे मार्गदर्शन घेऊन पुढील शैक्षणिक धोरण निश्चित करावे.

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
overcast clouds
22.7 ° C
22.7 °
22.7 °
89 %
5.2kmh
100 %
Wed
23 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
27 °
Sun
27 °
error: Content is protected !!