लोकक्रांती ऑनलाइन
Monsoon update : पंजाब डख यांनी सोमवार दि.१२ जून रोजी नवीन हवामान अंदाज व्यक्त केला आहे. अरबी समुद्रात झालेल्या चक्रीवादळामुळे समुद्रातील बाष्प वाहून नेण्यामध्ये बदल झाला असून ज्यावेळी हे वादळ जमिनीवर पोहोचेल त्यावेळी ते मान्सून कमकुवत करण्याचे कारण ठरेल असा अंदाज पंजाब डख यांनी व्यक्त केला आहे.
मान्सून पुढे नसरकण्याचे कारण
आरबी समुद्रामध्ये चक्रीवादळ झाल्यामुळे समुद्रातिल भाष्प ओढून नेत आहे सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास १६ जूनला हे चक्रीवादळ गुजरातच्या किनाऱ्यावर धडकणार आहे ज्यावेळी हे वादळ जमिनीवर जाणार त्यावेळी समुद्रातील हे बाष्प ओढून नेण्याचे काम ते करणार आहे त्यामुळे मान्सून कमकुवत होणार आहे
१३ ते १५ जून पर्यंत कोणत्या कोणत्या जिल्यात मान्सून जाणार
१३ ते १५ जूनला पश्चिम महाराष्ट्र, कोकण किनार पट्टी,सातारा, सांगली, कोल्हापूर,पुणे, जुन्नर, ओझर,नाशिक, निफाड या भागापर्यंत मान्सून सक्रिय राहणार आहे.या भागाच्या पुढे मान्सून सारकणार नाही असा अंदाज पंजाब डख यांनी व्यक्त केला आहे.
मागील २०१५ व २०१९ या वर्षीचे हवामान बदल
२०१५ साली अशीच परिस्थिती झाली होती आरबी समुद्रात चक्रीवादळ झाल्यामुळे सर्व बाष्प ओमान च्या दिशेने ओढून नेले होते तसेच २०१९ साली अशीच परिस्थिती तयार झाली होती आरबी समुद्रात चक्रीवादळ झाल्यामुळे केरळ मध्ये मान्सून साठी दहा दिवस विलंब करावा लागला होता.
मान्सून लगेच सर्वदूर पोहचणार नाही, पेरणीची घाई करू नये
एखादा पाऊस झाल्यानंतर लगेच पेरणी करू नये साधारणतः सात आठ इंच जमिनीत ओल गेल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणी करण्याचा निर्णय घ्यावा जास्त पावसाची वाट पहावी अन्यथा पेरणी साठी जास्त घाई करू नये. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर येणार नाही अशी डख यांनी सांगितले.
मान्सून पूर्वेकडून केंव्हा येतो
२०१९ या वर्षी अशाच आरबी समुद्रात झालेल्या चक्रीवादळाच्या परिस्थिती मुळे मान्सून केरळ पर्यंतच आला होता आणि नंतर मान्सून पूर्वेकडून आला होता त्यामुळे याही वर्षी अशीच परिस्थिती आहे त्यामुळे मान्सून पूर्वेकडून येईल. २२ जून नंतर महाराष्ट्रात सर्वत्र पाऊस होईल असा अंदाज पंजाब डख यांनी व्यक्त केला.
मान्सून कोणत्या भागात सक्रिय झाला आहे
सध्या मान्सून कोकण किनारपट्टी,पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात मान्सून सक्रिय राहणार आहे लगेच मान्सून सर्वदूर पोहचणार नाही असा हवामानाचा अंदाज पंजाब डख यांनी व्यक्त केलेला आहे.